‘देवगड अर्बन’साठी २८.९९ टक्के मतदान

‘देवगड अर्बन’साठी २८.९९ टक्के मतदान

79023
देवगड ः येथील अर्बन बँक निवडणुकीत मतदानासाठी वयोवृद्धांना मतदान केंद्रावर आणले जात होते.

79024
दुसऱ्या छायाचित्रात मतपेट्या बंदोबस्तात मतमोजणीच्या ठिकाणाकडे नेल्या जात होत्या. (छायाचित्र ः संतोष कुळकर्णी)


‘देवगड अर्बन’साठी २८.९९ टक्के मतदान

आज मतमोजणी; ३, ३४७ जणांनी बजावला मतदानाचा हक्क

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. २९ ः येथील दी देवगड अर्बन बँकेच्या निवडणुकीत आज सरासरी २८.९९ टक्के इतके मतदान झाले. एकूण ११ हजार ५२४ मतदारांपैकी ३ हजार ३४७ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. कासार्डे (ता. कणकवली) येथील केंद्रावर केवळ १३ मतदारांनी तर कुडाळ केंद्रावर १०० इतक्याच मतदारांनी मतदान केले. यावरून मतदारांमध्ये निरूत्साह असल्याचे चित्र समोर आले. दरम्यान, उद्या (ता.३०) सकाळी नऊला येथील बँकेच्या प्रधान कार्यालयात मतमोजणी होईल.
बँकेची एक जागा बिनविरोध झाल्याने उर्वरित १२ जागांसाठी आज मतदान घेतले गेले. यासाठी एकूण २२ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये देवगड तालुक्यासह कासार्डे (ता. कणकवली) आणि कुडाळ मिळून एकूण १० केंद्रावर सकाळी आठ ते दुपारी चार पर्यंत मतदान झाले. येथील शेठ म. ग. हायस्कूलमध्ये पाच मतदान केंद्रे होती. पाचही केंद्रावर मिळून असलेल्या एकूण ५ हजार ८२९ मतदारांपैकी १८९३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यातील पडेल येथील दोन मतदान केंद्रावर मिळून असलेल्या २२६९ मतदारांपैकी ६३९ मतदारांनी, नारिंग्रे येथील मतदान केंद्रावर १६३८ पैकी ७०२ मतदारांनी, कासार्डे (ता. कणकवली) येथील मतदान केंद्रावर ८८७ पैकी १३ मतदारांनी तर कुडाळ येथील केंद्रावर ९२० पैकी १०० मतदारांनी मतदान केले. एकूण ११ हजार ५२४ मतदारांपैकी ३ हजार ३४७ इतक्याच मतदारांनी मतदान केले. त्यामुळे एकूण मतदारांपैकी २८.९९ टक्के इतक्या मतदारांनीच मतदान केल्याचे चित्र होते. एकूण १३ जागांमध्ये देवगड तालुका वगळुन उर्वरित तालुक्यामधून सर्वसाधारणमध्ये असलेली एक जागा बिनविरोध झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील सात संचालक सर्वसाधारणमधून, दोन महिला संचालक तसेच अनुसूचित जाती जमातीमधून एक, इतर मागास प्रवर्गातील एक आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्ग यातून एक अशा एकूण १२ संचालकांसाठी निवडणूक घेतली गेली. यासाठी २२ उमेदवार रिंगणात होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) माणिक सांगळे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून येथील सहायक निबंधक (सहकारी संस्था) अनिल राहिंज काम पहात आहेत.
..................
चौकट
आज फैसला
निवडणूकीत भाजप आणि राष्ट्रवादी पुरस्कृत ‘शिवम् सहकार पॅनेल’ तर शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस पुरस्कृत ‘सहकार समृध्दी पॅनेल’ रिंगणात होते. त्यामुळे सकाळपासूनच राजकीय मंडळींची धावपळ पहायला मिळत होती. विविध राजकीय पक्षांची नेतेमंडळी मतदारांना मतदानासाठी आणण्याच्या नियोजनात दिसत होती. त्यामुळे केवळ देवगड शहराचे मतदान ३२.४७ टक्यावर पोचले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com