
खेळात यशस्वी होण्यासाठी हवी सूक्ष्म निरीक्षणशक्ती
rat३०२५.txt
बातमी क्र..२५ ( पान २)
rat३०p१८.jpg.ः
७९१६९
रत्नागिरी ः वार्षिक स्नेहसंमेलन आरोहण २ K २३ चे उद्घाटन करताना संस्थाध्यक्ष रवींद्र माने व मान्यवर.
यशासाठी हवी सूक्ष्म निरीक्षणशक्ती
पराग पानवलकर ; माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन
रत्नागिरी, ता. ३० ः करिअर घडवण्यामध्ये कला व क्रीडाप्रकारांचा फार उपयोग होतो. कोणत्याही क्षेत्राप्रमाणे खेळातही यशस्वी होण्यासाठी सूक्ष्म निरीक्षणशक्ती कामी येते,असे प्रतिपादन बॅडमिंटनपटू पराग पानवलकर यांनी केले. त्यांनी स्वतः २०१३ ला इटलीमध्ये व २०१७ ला न्यूझिलंडमध्ये आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेत मिळवलेल्या सुवर्णपदकांची यशस्वी गाथा विद्यार्थ्यांना ऐकवली. तालुक्यातील प्र. शि. संस्थेच्या राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे दिमाखात उद्घाटन झाले. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
महाविद्यालयाच्या प्रथेप्रमाणे आंबव ग्रामदेवता कालीश्रीच्या मंदिरामध्ये क्रीडाज्योत प्रज्वलित करून मैदानात मिरवणुकीने आणण्यात आली. महाविद्यालयाच्या ६ विभागातील विद्यार्थ्यांच्या तुकड्यांनी दिमाखदार ध्वजसंचालन करून मान्यवरांना सलामी दिली. उपस्थित मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना दाद लाभली. महिप सावंत याने सर्व विद्यार्थ्यांना संपूर्ण स्पर्धांमध्ये खिलाडूवृत्ती व शिस्त जोपासण्यासाठी शपथ दिली. परेड तुकड्यांच्या सर्व प्रमुखांनी शेवटी आपापल्या विभागाच्या ध्वजाची मैदानात स्थापना केली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश भागवत यांनी अशा स्पर्धांमुळे व्यवस्थापकीय कौशल्य, संवादक्षमता वाढण्यास मदत होऊन मानसिक ताण कमी होत असल्याने विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले. संस्थाध्यक्ष रवींद्र माने यांनी विद्यार्थ्यांना हे स्नेहसंमेलन उत्तम आठवणींची शिदोरी ठरेल तसेच सर्व स्पर्धा या स्तुत्य व प्रशंसनीय वातावरणात खेळण्याचा सल्ला त्यांनी दिला. यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांच्या ध्वजसंचालनाचा निकाल जाहीर केला. महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागाला या प्रकारामध्ये प्रथम क्रमांक जाहीर करण्यात आला. पुढील आठवडाभर विविध स्पर्धा पार पडणार असून ५ फेब्रुवारीला बक्षीस वितरण समारंभ तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन मोगरणकर, भक्ती सावंत, विशालिनी या विद्यार्थ्यांनी केले.