
चिपळूण ःमहाआरोग्य शिबिराचा 300 लोकांना लाभ
टुडे पान २
७९२२७
महाआरोग्य शिबिराचा ३०० लोकांना लाभ
एकता विकासमंचचे आयोजन ः रुग्णांना मोफत औषधे
चिपळूण, ता. ३०ः शहरात नव्याने स्थापन झालेल्या चिपळूण एकता विकासमंच आयोजित महाआरोग्य शिबिरात सुमारे ३००हून अधिक लोकांनी लाभ घेतला. भविष्यात ही संघटना शक्तिशाली बनेल आणि चिपळूण शहराचे नेतृत्व करेल, असा विश्वास आमदार शेखर निकम यांनी शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला.
शहरातील परांजपे हायस्कूल येथे पार पडलेल्या या शिबिराचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते उद्घाटन झाले. श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष सिद्धेश लाड यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. यानंतर आमदार निकम यांनी संघटनेच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आश्वासन देत महाआरोग्य शिबिर व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. यावेळी कार्याध्यक्ष शिरीष काटकर, अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, उपाध्यक्ष वसंत उदेग, हेमंत शिरगांवकर, दिशा दाभोळकर, राजन खेडेकर, डॉ. अब्बास जबले उपस्थित होते. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या सर्वांचे स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक कार्याध्यक्ष काटकर यांनी केले. संघटनेची ध्येयधोरणे व कार्याचा त्यांनी आढावा घेतला. अध्यक्ष डॉ. जाधव यांनी शिबिरात दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सोईसुविधांची माहिती दिली. शिबिरात सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शिबिरात मिलिंद कापडी, आशिष खातू, बाबू तांबे, अविनाश केळसकर, समीर जानवळकर, यासिन बारमारे, केशवराव कुंभार यांच्या हस्ते विविध वैद्यकीय कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी विविध तज्ञ डॉक्टर्स सहभागी झाले होते. हृदयरोग, अस्थिरोग, नेत्रविकार, महिलांच्या समस्या, शूगर, ईसीजी आदींच्या तपासण्या करण्यात आल्या. यामध्ये सुमारे ३०० लोकांनी सहभागी होऊन तपासण्या केल्या. काही आवश्यकता असलेल्या रुग्णांना मोफत औषधे देण्यात आली. या शिबिरात माधवबाग, अपरांत, इन्फिगो खेडचे डॉक्टर सहभागी झाले होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संघटनेचे सचिव अनंत हळदे, सहसचिव किरण बांद्रे, खालिद दाभोलकर, किसन चिपळूणकर, अजय भालेकर, सफाताई गोठे, पूनम भोजने, लक्ष्मण शिंदे, अनंत आंबुर्ले, मनोज शिंदे, नंदू चिटणीस, सचिन पाटेकर, विनायक पाटेकर व वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.