राजापूर अर्बन बँकेला बँको ब्लू रिबन पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर अर्बन बँकेला बँको ब्लू रिबन पुरस्कार
राजापूर अर्बन बँकेला बँको ब्लू रिबन पुरस्कार

राजापूर अर्बन बँकेला बँको ब्लू रिबन पुरस्कार

sakal_logo
By

rat३०३०.txt

(टुडे पान तीन)

राजापूर अर्बन बँकेला बँको ब्लू रिबन पुरस्कार

ग्राहकाभिमुख सेवेची पावती ; सलग दहाव्या वर्षी मोहोर

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३१ ः सहकार आणि व्यापारी क्षेत्रात कार्यरत कोल्हापूर येथील अविज् पब्लिकेशन, पुणेच्या गॅलक्सी इन्मा या सहकारी बँक संदर्भ ग्रंथ संस्थेकडून राजापूर अर्बन बँकेला बँको ब्लू रिबन २०२२ हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ३५० ते ४०० कोटी रुपये ठेवी या विभागातून पुरस्कार दिला जाणार आहे. अद्ययावत बॅंकिंग सुविधांच्या साहाय्याने ग्राहकाभिमुख सेवा उपलब्ध करून देणाऱ्‍या राजापूर अर्बन बँकेने सलग दहाव्या वर्षी या पुरस्कारावर मोहोर उमटवली.

पुढील महिन्यात महाबळेश्वर येथील एव्हरशाईन रिसॉर्ट येथे २७-२८ फेब्रुवारी व १ मार्च २०२३ ला होणाऱ्‍या अ‍ॅडव्हान्टेज न्युअल समिट २०२३ या कार्यक्रमात राजापूर अर्बन बँकेला हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बँकेचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. सुमारे १०२ वर्षापूर्वी स्थापना झालेल्या राजापूर अर्बन बँकेने सहकार क्षेत्रात अद्ययावत ग्राहकाभिमुख कामासाठी वेगळा ठसा उमटवला आहे. २००९ पासून एनपीए शून्य टक्के राखणाऱ्‍या बँकेने ग्राहकांसाठी अद्ययावत सुविधा दिल्या आहेत. सरकारी आणि खासगी बॅंकांप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅप, पेटीएम, फोनपे, गुगल आदी सारख्या अत्यावश्यक सुविधा ग्राहकांसाठी सेवाही सुरू केल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक राजापूर अर्बन बँकेशी जोडला गेला आहे. या सेवेबद्दल ग्राहकांमध्ये समाधान असून त्यांचा मोलाचा पाठिंबा बँकेला सातत्याने मिळत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र शासनाची ध्येयधोरणांची अंमलबजावणी करताना संचालक मंडळ प्रगती साधत आहे.

सलग दहाव्यावर्षी पुरस्कार...

बँकेने २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये केलेली आर्थिक घोडदौडीची दखल घेऊन अविज् पब्लिकेशन, कोल्हापूर आणि गॅलक्सी इन्मा, पुणे या सहकारी बँक संदर्भ ग्रंथ संस्थांनी विशेष दखल घेऊन सलग दहाव्या वर्षी बँकेला ’बँको’ ब्लू रिबन २०२२ पुरस्कार जाहीर केला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल बँकेच्या संचालक मंडळासह अधिकारी, कर्मचारी यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.