कोकण शिक्षक मतदारसंघासाठी 94 टक्के मतदान

कोकण शिक्षक मतदारसंघासाठी 94 टक्के मतदान

rat३०५.txt

बातमी क्र. ५ ( पान ३ साठी )

फोटो-
rat३०p४३.jpg-
७९३२०
रत्नागिरी- कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी होती.

rat३०p४४.jpg-
७९३२१
जयस्तंभ येथील बुथवर बाळासाहेबांची शिवसेना, भाजप युतीच्या पदाधिकाऱ्यांची लगबग होती.
rat३०p४५.jpg-
७९३२२
महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बुथवर गर्दी होती.
-----

कोकण शिक्षक मतदारसंघासाठी ९४ टक्के मतदान

बाळाराम पाटील विरूद्ध ज्ञानेश्वर म्हात्रे ; दोनही केंद्रांवर गर्दी


रत्नागिरी, ता. ३० : विधान परिषदेच्या कोकण शिक्षक मतदारसंघाच्या एका जागेसाठी सायंकाळी साडेपाचपर्यंत सरासरी ९४ टक्के मतदान झाले. मतदान प्रक्रिया अतिशय शांततेत पार पडली. या निवडणुकीत खरी चुरस महाविकास आघाडी पुरस्कृत शेकापचे उमेदवार विद्यमान आमदार बाळाराम पाटील विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेनेचे व भाजपा युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात आहे.
कोकण शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान झाले. जिल्ह्यात सुमारे ४ हजार १२० मतदार आहे. त्यासाठी जिल्ह्यात ११ मतदान केंद्र होती. या केंद्रांवर शांततेत मतदान झाले. या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कोकण शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडी पुरस्कृत शेकापचे उमेदवार विद्यमान आमदार बाळाराम पाटील हे आहेत. त्यांच्या विरुद्ध बाळासाहेबांची शिवसेनेचे व भाजपा युतीचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यात लढत रंगली आहे. यावेळी शिंदे गट आणि भाजपची ताकद कोकणात एकवटल्याने यावेळी बाळाराम पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान उभे राहिले आहे. विशेषतः ही जागा शिंदे गटाकडे असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद पणाला लावली आहे. रत्नागिरी शहरात मतदान होत असून बाळासाहेबांची शिवसेनेचे व भाजपा युतीचेउमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या जयस्तंभ येथे उभारण्यात आलेल्या बुथवर सकाळपासून उत्साह दिसत होता. तसाच महाविकास आघाडीच्या बुथवरही गर्दी होती. यावेळी आघाडीतील सर्व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

रत्नागिरी शहरातील केंद्र जिल्हाधिकारी कार्यालयात होते तर दुसरे केंद्र जाकादेवीमध्ये होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील केंद्रावर शिक्षक मतदारांची प्रचंड गर्दी होती. दोन ते तीन रांगा करून अगदी केंद्रापासून ते बाहेरच्या प्रवेशद्वारापर्यंत आल्या होत्या. जिल्ह्यात सर्व केंद्रावर शांतते मतदान झाले. सरासरी ९४ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले.
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com