मालवणात 26 फेब्रुवारीला बालनाट्य स्पर्धा

मालवणात 26 फेब्रुवारीला बालनाट्य स्पर्धा

मालवणात २६ फेब्रुवारीला
बालनाट्य स्पर्धाःओरसकर
मालवण, ता. ३० : पर्यावरणाचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. या जबाबदारीचे भान प्रत्येकालाच हवे. संस्कारक्षम वयात मुलांवर पर्यावरण संवर्धनाचे विचार रुजविणे गरजेचे आहे. त्यासाठी इको फोक्स् व्हेंचर्स, मँग्रूव्हज फाउंडेशन, स्वराध्या फाउंडेशन यांच्यावतीने २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० ते ९ या वेळेत मामा वरेरकर नाट्यगृह येथे जिल्हास्तरीय बालनाट्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. जैव विविधतेचा आसरा कांदळवन, तटरक्षक, धूपरक्षक कांदळवन पर्यावरणाचे फुफ्फुस कांदळवन या विषयावर स्पर्धक संघांनी बालनाट्याचे सादरीकरण करायचे आहे, अशी माहिती स्वराध्या फाउंडेशनचे गौरव ओरसकर यांनी दिली.
यावेळी नितीन वाळके, अभय कदम, गौरेश काजरेकर, सुधीर कुर्ले, विनायक भिलवडकर आदी उपस्थित होते. ओरसकर म्हणाले, "जैव विविधतेचा आसरा कांदळवन, तटरक्षक धूपरक्षक सैनिक कांदळवन, पर्यावरणाचे फुप्फुस कांदळवन या विषयावर विद्यार्थ्यांनी बालनाट्य सादर करायचे आहे. मराठी किंवा मालवणी नाट्य सादर करता येईल. प्रथम क्रमांकाला १२ हजार, चषक व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकाला ८ हजार चषक व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकाला ५ हजार, चषक व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ क्रमांकांना २ हजार, चषक व प्रमाणपत्र अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. उत्कृष्ट लेखन व दिग्दर्शनाला प्रत्येकी ५०० रूपये, चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. पुरुष अभिनय, स्त्री अभिनय यांच्यासाठी प्रथम तीन क्रमांकांना चषक, प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार आहे. तसेच तांत्रिक अंगासाठी प्रथम तीन क्रमांकाना चषक, प्रमाणपत्र व भेटवस्तू देण्यात येणार आहे. या स्पर्धेत पाचवी ते दहावीतील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. बालनाट्य लेखनासाठी अट ठेवण्यात आलेली नाही. यामध्ये लेखकांना सहभागी होता येईल. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ स्पर्धा पूर्ण झाल्यावर त्याच दिवशी रात्री ८ ते ९ यावेळेत मामा वरेरकर नाट्यगृहात पार पडेल. नावनोंदणीसाठी गौरव ओरसकर, गौरेश काजरेकर यांच्याशी संपर्क साधावा," असे आवाहन ओरसकर यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com