
राजापूर बँक निकाल
फोटो फाईल ः
1)rjp-30-2
अल्ताफ संगमेश्वरी
2)rjp-30-3
अनामिका जाधव
3)rjp-30-4
अनिल करंगुटकर
4)rjp-30-5
किशोर जाधव
5)rjp-30-6
प्रसाद मोहरकर
6)rjp-30-7
प्रतिभा रेडीज
राजापूर अर्बन बँक निकाल ः लोगो
सहकार पॅनेलचा तीन , परिवर्तनचा दोन जागांवर विजय
सहा जागांचे निकाल जाहीर ः नऊ जागांची मतमोजणी रात्री उशीरापर्यंत सुरू
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. 30 ः अवघ्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहीलेल्या राजापूर अर्बन बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीतील पंधरापैकी सहा जागांचे निकाल आज उशीरापर्यत जाहीर झाले. सत्ताधारी सहकार पॅनेल विरूद्ध परिवर्तन पॅनेल अशा झालेल्या लढतीमध्ये रात्री -- पर्यंत सहकार पॅनेलने तीन तर, परिवर्तन पॅनेलने दोन जागांवर विजय मिळविला आहे. तर, एका जागेवर अपक्ष उमेदवारीने बाजी मारली आहे. तर, उर्वरीत सर्वसाधारण राजापूर तालुक्यातील शाखांसाठीच्या जागांवरील मतमोजणी रात्री उशीरापर्यंत सुरू होती.
पंधरापैकी सहा जागांवरील निकाल रात्री नऊ पर्यंत जाहीर झाले असले तरी, नऊ जागांवरील मतमोजणीनंतर खऱ्या अर्थाने अर्बन बँकेवर नेमके वर्चस्व कोणाचे राहणार ? याचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे या मतमोजणीकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
राजापूर अर्बन बँकेची आज शहरातील श्रीमंगल कार्यालयामध्ये मतमोजणी सुरू आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश इंगळे यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुधीर कांबळे आणि राहुल खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय यंत्रणा मतमोजणीसह निवडणूक प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी कार्यरत आहे. मतमोजणीला सकाळी सुरुवात झाल्यानंतर दुपारी एक वाजता पहिला निकाल जाहीर करण्यात आला.
तालुक्याबाहेरील शाखांसाठी मतदार संघाची पहिली मतमोजणी करण्यात आली. त्यामध्ये अपक्ष उमेदवार अल्ताफ संगमेश्वरी यांना सर्वाधिक मते मिळवित विजयी झाले. त्यांनी सहकार पॅनेलचे रफिक नेवरेकर आणि परिवर्तन पॅनेलचे संजय यादव यांचा पराभव केला.
इतर मागास प्रतिनिधी मतदार संघात सहकार पॅनेलचे उमेदवार व विद्यमान संचालक अनिल करंगुटकर यांनी बाजी मारताना परिवर्तन पॅनेलचे उमेदवार जितेंद्र शिरवडकर यांचा पराभव केला.
अनुसुचित जाती जमाती प्रतिनिधी मतदार संघात झालेल्या चुरशीच्या लढतीमध्ये परिवर्तन पॅनेलचे उमेदवार किशोर जाधव यांनी सहकार पॅनेलचे विद्यमान संचालक सुनिल जाधव यांचा पराभव केला आहे. तर, भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी मतदार संघातून सहकार पॅनेलचे उमेदवार आणि विद्यमान संचालक प्रसाद मोहरकर यांनी परिवर्तन पॅनेलचे उमेदवार रामचंद्र वरेकर यांचा पराभव केला आहे.
महिला प्रतिनिधी मतदार संघात अत्यंत चुरशीची लढत झाली. दोन जागांसाठी झालेल्या लढतीमध्ये सहकार पॅनेलच्या उमेदवार आणि विद्यमान संचालिका अनामिका जाधव, परिवर्तन पॅनेलच्या उमेदवार प्रतिभा रेडीज या विजयी झाल्या आहेत. तर, परिवर्तन पॅनेलच्या उमेदवार निता चव्हाण आणि सहकार पॅनेलच्या उमेदवार आणि विद्यमान संचालीका धनश्री मोरे या पराभूत झाल्या आहेत.
उर्वरीत सर्वसाधारण राजापूर तालुक्यातील शाखांसाठीच्या नऊ जागेवरील मतमोजणी रात्री उशीरापर्यंत सुरू होती. या 9 जागांवर 18 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये नेमकी कोण बाजी मारणार ? याकडे आता सार्यांचे लक्ष लागून राहीले आहे.