हुमरमळ्यातील भजनी परंपरा आदर्श | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हुमरमळ्यातील भजनी परंपरा आदर्श
हुमरमळ्यातील भजनी परंपरा आदर्श

हुमरमळ्यातील भजनी परंपरा आदर्श

sakal_logo
By

79407
हुमरमळा ः श्री चव्हाटेश्वर हुमरमळा (अणाव) येथील भजन स्पर्धेचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करताना अतुल बंगे, नागेंद्र परब, अमरसेन सावंत. (छायाचित्र ः अजय सावंत)

हुमरमळ्यातील भजनी परंपरा आदर्श

अतुल बंगे ः चव्हाटेश्‍वर मंदिरात स्पर्धेचे उद्‍घाटन

कुडाळ, ता. ३१ ः हुमरमळा श्री चव्हाटेश्वर मंदीरामध्ये हरीनाम सप्ताह म्हणजे भजनीं परंपरा जोपासण्याचे आदर्श काम या गावातील तरुण पिढीने जोपासले आहे असे प्रतिपादन शिवसेना पदाधिकारी अतुल बंगे यांनी भजन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
श्री चव्हाटेश्वर हुमरमळा (अणाव) येथील भजन स्पर्धेचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन श्री बंगे यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, “दरवर्षी या मंदिरामध्ये हरीनाम सप्ताह कार्यक्रमाबरोबर बाल भजनी कलाकारांना प्रोत्साहन म्हणून भजनस्पर्धांचे आयोजन केले जाते. या देवस्थानची व्यवस्थापन समिती निस्वार्थीपणे काम करत असुन जिल्ह्यातील आदर्श कमिटी बरोबर सुयोग्य नियोजन आखणी केली जाते हे विशेष आहे. जिल्ह्यातील मंदीरामधले या देवालयाचे मंदीर अगदी देखण आणि सुंदर आहे. या गावाने भजनी परंपरा, संतपरंपरा,जोपासत (कै.) माजी आमदार पुष्पसेन सावंत, (कै.) तात्या पालव, (कै.) भास्कर पालव, (कै.) आबा डीगसकर -सावंत, मधु कासले यांच्या सारख्या ज्येष्ठांनी जी यशस्वी वाटचाल केली त्याच परंपरेने नविन पिढी नागेंद्र परब, अमरसेन सावंत,जयभारत पालव, पोलिस पाटील उत्तम पालव यांच्या सारख्या व्यक्तीने जुन्या पिढीतील लोकांचा आदर्श घेऊन काम करीत आहेत. त्यामुळेच या कार्यक्रमाला दरवर्षी उभारी मिळत आहे. म्हणूनच भजन स्पर्धेचे कौतुक करत असताना इथल्या तरुण पिढीचे कौतुकही तेवढेच करावेसे वाटते.”
यावेळी शिवसेनेचे गटनेते माजी जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, अणाव सरपंच लिलाधर अणावकर, संगीत विशारद महेश सावंत,भजनी बुवा श्री परब, यांनीही आपले विचार मांडले. यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख सुशिल चिंदरकर, काका पालव, कुडाळ तालुका शिवसेना सहकार तालुका प्रमुख बाळु पालव, भजनी बुवा श्री दळवी, देवस्थानचे नाना मांडकर, तबलाविशारद बाबु खडपकर, शिवसेनेचे शिवराम अणावकर उपस्थित होते. माजी उपसभापती जयभारत पालव यांनी आभार मानले.