
सूर्यनमस्कार स्पर्धेस सावंतवाडीत प्रतिसाद
79411
सावंतवाडी : सूर्यनमस्कार स्पर्धेत सहभागी महिला.
सूर्यनमस्कार स्पर्धेस सावंतवाडीत प्रतिसाद
सावंतवाडी ता. ३१ : भरारी फाऊडेशनच्यावतीने जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून शनिवारी येथे महिलांसाठी सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन केले होते. याला चांगला प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेत महिला मोठ्या संख्येने सहभागी व्हाव्या, तसेच त्यांनी आपल्या आरोग्याविषयी जागृत व्हावे, हा या मागचा उद्देश होता. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ श्रीमती तुपकर, डॉ रेवती लेले, सौ रेखा कुमठेकर आदी उपस्थित होत्या. ६५ वर्षाच्या स्मिता कोठावळे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. द्वितीय क्रमांक माधुरी नार्वेकर, तृतीय क्रमांक शबाना शेख यांनी मिळविला. शिवानी औराती आणि रुचिता राठोड यांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय उत्तेजनार्थ क्रमांक मिळविले. घे भरारी फाऊंडेशन अध्यक्षा मोहिनी मडगावकर, उपाध्यक्षा रिया रेडिज, खजिनदार अदिती नाईक, मेघा डूबळे, वैशाली कारेकर, शारदा गुरव आदी उपस्थित होते.