न्हावेलीतील काजू बागांमध्ये
गव्यांच्या कळपाचा धूडगुस

न्हावेलीतील काजू बागांमध्ये गव्यांच्या कळपाचा धूडगुस

79434
न्हावेलीत : गव्यांकडून काजू बागायतीचे झालेले नुकसान.

न्हावेलीतील काजू बागांमध्ये
गव्यांच्या कळपाचा धूडगुस

कलमे जमीनदोस्त; बंदोबस्ताची मागणी

सावंतवाडी ता. ३१ : न्हावेली-गोळचेगावळ येथील काजू बागायतीमध्ये रविवारी पहाटे गव्यांच्या कळपाने बागायतदारांचे मोठे नुकसान केले. काजूची लागती कलमे भुईसपाट केल्याने अंदाजे पन्नास हजारांचे नुकसान झाल्याचे शेतकरी बागायतदारांनी सांगितले. वनविभागाने अशा उच्छाद मांडणाऱ्या गव्यांचा बंदोबस्त करावा व झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी केली.
ऐन काजू हंगामात तीन ते चार गव्यांचा कळप न्हावेली गोळाचेगावळ येथे आला आहे. तीन वर्ष मेहनत करून उत्पन्न देणारी काजूची कलमे बागायतदारांनी तयार केली होती. सद्यस्थितीत उत्पन्न देणारी कलमे गव्यांनी जमीनदोस्त केल्याने आमचे अंदाजे ५० हजारांच्यावर नुकसान झाल्याचे काजू बागायतदार धोंडू परब, भदूजी नाईक, दिपक नाईक यांनी सांगितले. वारंवार होणाऱ्या नुकसानीपासून कायमस्वरूपी तोडगा काढत अशा उपद्रवी रानटी प्राण्यांचा वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा व आमची झालेली नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त काजू बागायतदार शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com