ग्राहक चळवळीचे हरिहर नाचणोलकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ग्राहक चळवळीचे हरिहर
नाचणोलकर यांचे निधन
ग्राहक चळवळीचे हरिहर नाचणोलकर यांचे निधन

ग्राहक चळवळीचे हरिहर नाचणोलकर यांचे निधन

sakal_logo
By

79483
हरिहर नाचणोलकर


ग्राहक चळवळीतील हरिहर
नाचणोलकर यांचे निधन

मालवण, ता. ३१ : शहरातील मेढा येथील रहिवासी हरिहर महादेव नाचणोलकर (वय ९३) यांचे काल निधन झाले. नाचणोलकर यांनी सिंडिकेट बँकमध्ये २८ वर्षे सेवा केली होती. कसाल, कणकवली, सावंतवाडी या ठिकाणी ते कार्यरत होते, निवृत्ती नंतर ते मालवण येथे आपल्या गावी स्थायिक झाले. १९८७ मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्राहक चळवळीची बिजे त्यांनी रोवली. १९८७ ला मुंबई ग्राहक पंचायतचे माधव मंत्री यांच्या सहकार्याने सर्वप्रथम सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिर येथे पहिली बैठक त्यांनी घेतली व त्यानंतर ग्राहक पंचायतची काम सुरु केले. अनेक ग्राहकांना न्याय देण्यासाठी ते स्वतः ग्राहक न्यायालयात जवळ जवळ १५ ते १६ वर्षे दावे चालवत असत. कितीतरी प्रकरणात त्यांनी ग्राहकांना न्याय मिळवून दिला आहे. अनेकांना त्यांचे मार्गदर्शन व सल्ला लाभला आहे. ते प्रचंड न्यायनिष्ठुर होते. शिस्तप्रिय व सडेतोड व्यक्तीमत्व म्हणून ते ओळखले जात. येथील फोवकांडा पिंपळ येथील वृत्तपत्र विक्रेते व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे सचिव किशोर नाचणोलकर यांचे ते वडील होत.