साखरेचा ट्रक उलटून हातखंबा येथे चालक ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साखरेचा ट्रक उलटून हातखंबा येथे चालक ठार
साखरेचा ट्रक उलटून हातखंबा येथे चालक ठार

साखरेचा ट्रक उलटून हातखंबा येथे चालक ठार

sakal_logo
By

rat३१११.txt

(टुडे पान ३ मेन)
ओळी- rat३१p४.jpg-
७९४७८
नाणीज ः मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबा येथे सोमवारी सकाळी उलटलेला साखरेचा ट्रक. (छाया ः राजन बोडेकर)

साखरेचा ट्रक उलटून चालक ठार, क्लिनर गंभीर

हातखंबा दर्ग्याजवळ अपघात ; एका बैलाचाही मृत्यू

रत्नागिरी, ता. ३१ ः मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा दर्ग्याजवळील उतार व वळणावर सोमवारी सकाळी साखर घेऊन जाणारा ट्रक उलटला. त्यात चालक जागीच ठार झाला तर क्लिनर गंभीर जखमी झाला आहे.
अपघाताबाबत मिळालेल्या महितीनुसार कर्नाटकातून ट्रक जयगड बंदराकडे साखर घेऊन येत होता. हातखंबा येथील उतारावर नियंत्रण सुटल्यामुळे तो बाजूच्या मोकळ्या जागेत उलटला. त्यात ट्रक चालक फारुख इसाक जमादार (वय ३८) हे जागीच ठार झाले, तर क्लिनर कमरान कलादगी (२४) हे जखमी झाले. दोघेही बागलकोट, कर्नाटक येथील आहेत. जखमीला जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या हातखंबा येथील रुग्णवाहिकेने तत्काळ रत्नागिरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. ट्रक उलटला येथे याचवेळी येथे दोन बैल चरत होते. या ट्रकच्या धडकेने त्यातील एक बैलही जागीच ठार झाला. अपघाताची माहिती मिळताच हातखंबा येथील महामार्गाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमर पाटील व घोसाळे, सावंत, उतेकर, घटनास्थळी तत्काळ दाखल झाले आणि वाहतूक पूर्ववत केली. अपघातग्रस्त ट्रक पूर्ण उलटा झाला असून, त्यातील साखरेची पोती धुळीत पडून नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थनिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. त्यांनी जखमींना बाहेर काढण्यास व रुग्णवाहिकेत ठेवण्यात मदत केली.

उपाययोजनेची मागणी...
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा उतार व वळणावर वारंवार असे ट्रकचे अपघात होत असतात. महिन्याभरापूर्वी याच ठिकाणी साखरेने भरलेले दोन ट्रकचा अपघात झाला होता. धडकेनंतर ट्रकने पेट घेतला होता. अवजड ट्रकचे वारंवार अपघात होत असल्याने या मार्गावर वेळीच उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.