इनरव्हीलतर्फे सावंतवाडीत जयपूर फूट वितरण होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इनरव्हीलतर्फे सावंतवाडीत
जयपूर फूट वितरण होणार
इनरव्हीलतर्फे सावंतवाडीत जयपूर फूट वितरण होणार

इनरव्हीलतर्फे सावंतवाडीत जयपूर फूट वितरण होणार

sakal_logo
By

79501
सावंतवाडी : येथे काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये लाभार्थी.

इनरव्हीलतर्फे सावंतवाडीत
जयपूर फूट वितरण होणार

सावंतवाडी, ता. ३१: येथील इनरव्हील क्लबच्या माध्यमातून जिल्ह्यातील अपंगाना जयपुर फुटचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी कोल्हापुर येथील रोटरी क्लब ऑफ कोल्हापुर व लोक कल्याण मंडळ यांनी पुढाकार घेतला आहे. या पार्श्‍वभूमीवर आज गरजूंच्या पायाची मापे घेण्यात आली. याचा तब्बल पन्नासहून अधिक रुग्णांनी लाभ घेतला.
इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीतर्फे रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर ,लोक-कल्याण मंडळ कोल्हापूर यांच्या सहकार्याने जयपूर फूट कृत्रिम पाय व हात बसवणे हा कार्यक्रम आज येथे काझी शहाबुद्दीन बहुउद्देशीय सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमांमध्ये सुमारे ५० हून अधिक लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. इनरव्हील क्लब ऑफ सावंतवाडीच्यावतीने लाभार्थ्यांना पूर्ण मोफत कृत्रिम पाय व हात देण्यासाठी लाभार्थ्यांच्या हातापायांचे मेजरमेंट घेण्यात आले. इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा दर्शना रासम, सेक्रेटरी भारती देशमुख, खजिनदार सोनाली खोजुवेकर, तसेच सदस्य डॉक्टर अमृता स्वार, डॉक्टर शुभदा करमळकर, पूजा पोकळे, रिया रेडीज, श्रेया नाईक, अनिता भाट, मृणाली कशाळीकर, एडवोकेट सायली दुभाषी, शितल केसरकर, या प्रेरणादायी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.