रत्नागिरी- जिल्हा प्रासादिक महिला भजन मंडळातर्फे

रत्नागिरी- जिल्हा प्रासादिक महिला भजन मंडळातर्फे

महिलांनी सक्षमपणे जगायला शिकलं पाहिजे

सरोज हरचकर ; महिला भजन मंडळातर्फे कृतज्ञता सोहळा

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ : सावित्रीबाई फुले यांनी आपणाला या रंगमंचावर आणलं स्त्री शिक्षणाचा व सज्ञानतेचा धडा आपणाला त्यांनी दिला. पण आपला तो हक्क आज आपण सार्थकी लावत आहोत. आजच्या युगात काही अंशी महिला मागे राहत आहेत. तरी महिलांनी सक्षमपणे जगायला शिकलं पाहिजे हीच काळाची गरज आहे असे मत सरोज हरचकर यांनी व्यक्त केले.
आभार संस्था संचलित रत्नागिरी जिल्हा प्रासादिक भजन मंडळाच्या रत्नागिरी महिला शाखेच्या वतीने महिलांसाठी कृतज्ञता सोहळ्यात त्या बोलत होत्या. जयस्तंभ येथील महिला मंडळ सभागृहात रंगला. हा कार्यक्रम भजन मंडळाचे अध्यक्ष साईनाथ नागवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला शाखेच्या अध्यक्षा सौ. ऐश्वर्या कीर यांच्या अध्यतेखाली झाला.
या वेळी सुरेखा जोशी, सरोज हरचकर, वंदना देसाई, दादा वाडेकर, शरद गोळपकर, प्रविण सावंतदेसाई, संजय मेस्त्री बुवा, सागर मांयगडे, एकनाथ पडंये बुवा, सागर मा़यगडे, नीलेश मेस्त्री आदी उपस्थित होते. सर्वता चव्हाण, स्नेहा शेट्ये, पूनम गोळपकर, शितल सकपाळ, वेदा शेट्ये, प्रेरणा विलणकर, सौ. उत्तेकर यांनी सुमधूर स्वागतगीत सादर केले.
किशोरवयीन मुलींकडे प्रथम आई- वडिलांनी संस्कार देताना आपल्या मुलीचे वर्तनाकडे लक्ष द्यायलाच हवं तर आपलं रक्षण करण्यासाठी मुलींनीही कणखर व्हायला शिकलं पाहिजे. आपलं संरक्षण आपणच करायला हवे, असे उद्गगार सुरेखा जोशी यांनी काढले. मकरसक्रांत हा सण महिलांसाठी उर्जा देणारा सण आहे. त्यापाठीमागेही विज्ञान आहे, असे सौ. ऐश्वर्या किर यांनी सांगितले. कार्यक्रमासाठी पूनम गोळपकर यांनी भेटवस्तू दिली.

चौकट १
लोकनृत्य स्पर्धा
त्यानंतर लोकनृत्य स्पर्धा झाली. त्या मध्ये प्रथम तुळजाभवानी भजन मंडळ, द्वितीय ओम साई भजन मंडळ आंबेशेत, तृतीय नवलाई भजन मंडळ, नाचणे, उत्तेजनार्थ लक्ष्मीकांत रवळनाथ महिला भजन मंडळ भाट्ये, महालक्ष्मी महीला भजन मंडळ खेडशी यांना बक्षासे देऊन गौरविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com