रत्नागिरी- सं. अवघी विठाई माझी मधून संतश्रेष्ठ सावता माळ्याचा जीवनपट उलगडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी- सं. अवघी विठाई माझी मधून संतश्रेष्ठ सावता माळ्याचा जीवनपट उलगडला
रत्नागिरी- सं. अवघी विठाई माझी मधून संतश्रेष्ठ सावता माळ्याचा जीवनपट उलगडला

रत्नागिरी- सं. अवघी विठाई माझी मधून संतश्रेष्ठ सावता माळ्याचा जीवनपट उलगडला

sakal_logo
By

(टीप- राज्य नाट्य स्पर्धा लोगो)

पान ७ वरून लोगो घेणे...
rat३१p३.jpg-ओळी ःKOP२३L७९४२१

रत्नागिरी ः राज्य नाट्य स्पर्धेत स्वर साधना सांस्कृतिक मंडळाच्या संगीत अवघी विठाई माझी या नाटकातील एक क्षण (नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
-------

अवघी विठाई माझीमधून सावता माळ्यांचा जीवनपट उलगडला

नवोदितांना स्पर्धात्मक रंगभूमीवर वावरण्याची संधी ः स्वर साधना सांस्कृतिक मंडळाचा प्रय़त्न सफल
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २५ ः राज्य नाट्य स्पर्धेच्या पंचम नाट्य पुष्पात स्वर साधना सांस्कृतिक संस्था मांद्रे-पेडणे, गोवा. या संस्थेने लेखक नरेंद्र मधूकर नाईक यांच्या लेखणीतून उतरेलेल सं. अवघी विठाई माझी हे नाटक सादर केले. या नाटकाचे दिग्दर्शन हरिष शेटगांवकर यांनी केले. नवीन कोरी संहिता, नवोदित कलाकारांना घेऊन वारकरी पंथातील संतश्रेष्ठ सावता माळी यांचा जीवनपट उलगडण्यास संस्थेचा प्रयत्न सफल झाला. तर नवोदितांना स्पर्धात्मक रंगभूमीवर वावरण्याचा अनुभव दिला. उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या संतश्रेष्ठांच्या मांदियाळीत नाट्यपदातील लयकारीचा मेळ बसला रसिकांनी कलाकारांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
-------
काय आहे नाटक?
संतश्रेष्ठ सावतामाळी यांच्या जीवनावर आधारीत सं. अवघी विठाई माझी हे नाटक आहे. विठ्ठल भक्तीत दंगून जाणाऱ्या संत सावता माळ्याला गावातील कर्मठ लोक त्रास देतात. पण सावत्याची ईश्वराशी निस्सिम भक्ती, विश्वास सेवेतून बाजूला करु शकत नाही असेच चित्र या नाटकातून पहायला मिळाले. लोकांनी दिलेला त्रास, मारहाण अगदी उसाच्या मळ्याला आग देखील ते लावतात. भाजीपाला करणे हीच ईश्वरभक्ती असे समजणाऱ्या सावत्याच्या भाजीपाल्याच्या मळ्याची नासधूसही करतात. पण संत सावता विठ्ठल कृपेने सहीसलामत बाहेर पडतात. या नाटकाच्या उत्तरार्धात संत सावतामाळी मळ्याचा धनी म्हणून विठ्ठलाकडे पहात असतो. मात्र त्याची मुलगी सावत्याकडे मळ्याचा धनी पहाण्यासाठी हट्ट धरुन बसते. त्यामध्ये ती आजारी पडते. त्यानतंर संत सावता माळी मुलीचे प्राण वाचविण्यासाठी विठ्ठलाकडे साकडे घालतो. त्यावेळी सावत्याच्या मुलीला आणि कुटुंबाला विठ्ठल दर्शन देतो अशी कथा या सं. अवघी विठाई माझी या नाटकातून अधोरेखित केली आहे. नवीन संहिता, नवीन नाट्यपदांचा उगम, तसेच नवोदित कलाकारांनी केलेला अभिनय रसिकांना पहायला मिळाला. त्याबरोबर वारकरी संप्रदायाची अनुभूती आली. स्वरसाधना सांस्कृतिक संस्थेने केलेला हा प्रयत्न रसिकांना भावला.
-----
* पात्र परिचय
सावता माळी ः समीर शेट्ये, पाटील ः हरीश शेटगावकर, परशा ः व्ही. जी. शेटगावकर, नामी ः आघा शेटगावकर, जनाई ः सौ. निवेदिता पुणेकर, महादेव शास्त्री ः कृष्णा सावंत, नामदेव ः सुरज शेटगांवकर, ज्ञानदेव ः साहील शेटंगावकर, काशिबा गुरव ः प्रसाद परब. वारकरी जिवाजी ः वामन शेटगांवकर, विठ्ठल ः यतीन म्हादळेकर, हष्मा ः प्रसाद शेटगांवकर, प्रमुख गावकरी ः समीर शेटगांवकर, विठू सावंत, अजित शेटगांवकर, विशाल शेटगांवकर. दिंडी वारकरी ः प्रसाद फडते, नयनी शेटगांवकर, दीपा शेटगांवकर, वैशाली शेटगांवकर, पल्लवी शेटगांवकर, सुरेखा शेटगांवकर, सुप्रिया शेट्ये, विशाल शेटगांवकर
--------
* सूत्रधार आणि साह्य
निर्मिती प्रमुख ः अमित शेंटगांवकर, संगीत संयोजन आणि ऑर्गन ः नारायण असोलकर, तबला ः बुद्धेश तळकर, पखवाज ः चंदन शेटगांवकर, मंजिरी ः विनय महाले, पार्श्वसंगीत ः परेश नाईक. प्रकाश योजना ः पांडुरंग पेडणेकर, नेपथ्य ः प्रवीण म्हामल, रामदास परब. वेशभूषा ः प्रदिप कोरगांवकर, रंगभूषा ः भास्कर म्हामल.
--------
आजचे नाटक
नाटक ः संगीत ययाती आणि देवयांनी. सादरकर्ते ः श्री ओंकार थिएटर्स, पेडणे, गोवा. स्थळ ः स्वातंत्र्यवीर, वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी. वेळ ः सायंकाळी ७ वाजता.