तरुणीवरील अत्याचार प्रकरणी एकाला ७ वर्षे कारावास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तरुणीवरील अत्याचार प्रकरणी एकाला ७ वर्षे कारावास
तरुणीवरील अत्याचार प्रकरणी एकाला ७ वर्षे कारावास

तरुणीवरील अत्याचार प्रकरणी एकाला ७ वर्षे कारावास

sakal_logo
By

तरुणीवरील अत्याचारप्रकरणी
एकाला ७ वर्षे कारावास

तीन वर्षांपूर्वीची घटना; महाविद्यालयातून परततानाचा प्रकार

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३१ ः राजापूर तालुक्यातील एका महाविद्यालयीन तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप सिद्ध झाल्याने आरोपीला जिल्हा न्यायालयाने ७ वर्षांचा सश्रम कारावास व १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. सव्वा ३ वर्षांपूवी पायवाटेवरून घरी जात असताना हा प्रकार घडला होता.
सुरेंद्र सुरेश बाईत (वय २२, रा. कोड्ये तर्फेसौंदळ मधलीवाडी, राजापूर) असे शिक्षा ठोठवण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना २५ सप्टेंबर २०१९ ला घडली होती. पीडित तरुणी ही त्यावेळी बारावीत शिकत होती. २५ सप्टेंबरला ती सकाळी पावणे आठच्या सुमारास महाविद्यालयात रांगोळी स्पर्धा असल्याने गेली होती. पावणेबाराच्या सुमारास ती घरी परतत होती. गावातील पायवाटेने घरी जात असताना त्याच ठिकाणी गुरे चरवण्यासाठी गेलेल्या आरोपीने तरुणीला जंगलात फरपटत नेले. ‘ओरडलीस तर तुला मारुन टाकीन’, अशी धमकी दिली. तिला जखमी करत तिच्यावर अत्याचार केला होता. याप्रकरणी पीडितेने राजापूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध कलम ३७६ सह ५११, ३५४, ३२३, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. राजापूर पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक एस. एम. वालावलकर यांनी तपास केला. पोलिसांनी संशयितास अटक करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते.
मंगळवारी (ता. ३१) या खटल्याचा निकाल जिल्हा न्यायाधीश व्ही. आर. जोशी यांच्या न्यायालयात झाला. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अ‍ॅड. प्रफुल्ल साळवी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला भादंवि कलम ३७६ सह ५११ मध्ये ७ वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड. तसेच दंड न भरल्यास १ वर्ष साधी कैद; तसेच कलम ३५४ मध्ये २ वर्ष शिक्षा, ५ हजार दंड तसेच कलम ३२३ व ५०६ मध्ये सहा-सहा महिने साध्या कैदेची शिक्षा ठोठावली. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हेड कॉन्स्टेबल किरण सकपाळे यांनी काम पाहिले.