
डिगसमध्ये केएफडी बाधीत गोचीड सापडल्याने खळबळ
79618
डिगस ः खांदीचे गाळू येथे केएफडी बाधित गोचीड सापडल्याने नमुने घेण्यात आले.
डिगसमध्ये केएफडी बाधीत
गोचीड सापडल्याने खळबळ
कुडाळ, ता. ३१ ः डिगस-खांदीचे गाळू (ता.कुडाळ) येथे केएफडी बाधित गोचीड सापडल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्ययंत्रणेत खळबळ उडाली आहे. काही वर्षापूर्वी केएफडी बाधीत गोचडीमुळे प्रसार होणाऱ्या माकडतापाने जिल्ह्यात थैमान घातले होते.
पुणे एनआयव्ही प्रयोगशाळेकडून हा अहवाल सिंधुदुर्ग जिल्हा आरोग्य यंत्रणेला पाठविण्यात आला असून आरोग्य यंत्रणेचे जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रमेश कर्तसकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र पणदुर येथे भेट देत आरोग्य कर्मचाऱ्यां सूचना दिल्या आहेत. डिगस ग्रामपंचायतला भेट देत पंचायत सरपंच पूनम पवार यांना याबाबतची कल्पना दिली आहे. याबाबतचे सर्वेक्षण आरोग्य कर्मचारी सागर किनलेकर यांनी केले. यावेळी ३८ गोचीड नमुने पुणे एनआयव्ही कडे पाठविण्यात आले होते. यापैकी सर्वच्या सर्व नमुने केएफडी बाधित आले आहेत; मात्र तब्बल दोन वर्षानंतर पुन्हा गोचीड केएफडी बाधित सापडल्याने माकडताप पुन्हा जिल्हयात सक्रिय होतोय का? असा प्रश्न समोर आला आहे.