सावंतवाडी पालिकेसाठी अग्निशमन बंब आवश्यक

सावंतवाडी पालिकेसाठी 
अग्निशमन बंब आवश्यक

79839
बबन साळगावकर

सावंतवाडी पालिकेसाठी
अग्निशमन बंब आवश्यक

साळगावकर ः पालकमंत्र्यांकडे मागणी

सावंतवाडी, ता. १ ः येथील पालिकेची आजारी असलेली अग्निशमन यंत्रणा सक्षम होण्यासाठी एका महिन्याच्या आत पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी शहराला नवीन अग्निशमन बंब उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली आहे. गेली अनेक वर्षे निधी मंजूर होऊन सुध्दा फायर स्टेशनचा प्रकल्प रेंगाळला आहे. तो मार्गी लागण्यासाठी योग्य तो पाठपुरावा करावा, अशीही मागणी त्यांनी केली.
शहरात काल (ता. ३१) रात्री लागलेल्या आगीनंतर बंद असलेला पालिकेचा बंब उपलब्ध झाला नाही. माहितीनंतर तो बंब नादुरुस्त असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी नळाच्या पाण्याने हे आग विझविली. एकूणच या प्रकाराबाबत नागरिकांतून पालिकेबाबत नाराजी व्यक्त झाली. या पार्श्वभूमीवर साळगावकर यांनी प्रसिध्दी पत्रकाच्या माध्यमातून ही प्रतिक्रिया दिली. त्यात म्हटले आहे की, गेली अनेक वर्षे रखडलेला फायर स्टेशन आणि अग्निशमन बंब शहराला उपलब्ध होणे आवश्यक आहे. काल रात्री घडलेल्या प्रकारानंतर प्रकर्षाने याची जाणीव झाली आहे. पालिकेकडे असलेला फायर फायटर नादुरुस्त असल्यामुळे आग लागलेल्या ठिकाणी गाडी पोचू शकली नाही; मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. भविष्यामध्ये कोणती हानी होऊ नये, यासाठी येथील राज्य लोकप्रतिनिधींनी तसेच पालकमंत्री चव्हाण यांनी लक्ष देऊन पालिकेला एक महिन्याच्या आत फायर फायटर मिळण्यासाठी निधी द्यावा, अशी मागणी साळगावकर यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com