राजापूर ः सौंदळ व्हॉल्टस्टेशनला पूर्ण स्थानकाची प्रतीक्षा

राजापूर ः सौंदळ व्हॉल्टस्टेशनला पूर्ण स्थानकाची प्रतीक्षा

फोटो ओळी
-rat२p२४.jpg ः

KOP२३L७९९४५ राजापूर ः सौंदळ रेल्वेस्टेशन.
--

सौंदळ व्हॉल्टस्टेशनला पूर्ण स्थानकाची प्रतीक्षा

मोजक्याच गाड्यांना थांबा ; प्रवाशांची सोय होण्याची अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ३ ः कोकण रेल्वेमार्गावरील सौंदळ व्हॉल्टस्टेशनमुळे अनेकांचे सुखद रेल्वेसवारीचे स्वप्न साकार झाले आहे. या ठिकाणी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळून कोकण रेल्वेलाही चांगले उत्पन्नही मिळत आहे. मात्र, विविध सोयीसुविधांसह अनेक रेल्व गाड्यांच्या थांब्याच्या प्रतिक्षेत असलेल्या या रेल्वेस्थानकाला पूर्ण स्थानक म्हणून शिक्कामोर्तबाची प्रतीक्षा राहिली आहे.
कोकण रेल्वेमार्गावर सौंदळ येथे रेल्वेस्टेशन व्हावे, यासाठी सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली सौंदळ रेल्वेस्टेशन निर्माण समिती सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा केला. त्याला यश येऊन तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या सहकार्याने सौंदळ व्हॉल्टस्टेशनला मंजुरी मिळाली. त्याची उभारणी होऊन प्रभू यांच्या हस्ते या व्हॉल्टस्टेशनचे तीन वर्षापूर्वी उद्घाटन झाले. कोकण रेल्वेमार्गावरील सौंदळ येथील व्हॉल्टस्टेशन तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळतो. या ठिकाणी उतरणे आणि गाडी पकडण्यासाठी प्रवाशांकडून पहिली पसंती दिली जात आहे.
प्रवाशांच्या मिळणाऱ्‍या या प्रतिसादातून कोकण रेल्वेलाही चांगले उत्पन्न मिळत आहे. या रेल्वेस्टेशनला कोकण रेल्वेकडून पूर्ण स्थानक म्हणून मंजुरी मिळाली नसून व्हॉल्टस्टेशन म्हणून मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी केवळ मोजक्या गाड्या थांबतात. मात्र, पूर्ण स्थानक म्हणून मंजुरी मिळाल्यास कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्‍या अन्य गाड्याही थांबणार आहेत. त्याचा फायदा प्रवाशांना मिळणार आहे. त्यामुळे तीन वर्षापूर्वी आरंभ झालेल्या या व्हॉल्टस्टेशनचे पूर्ण स्थानकामध्ये रूपांतर करून त्याला मंजुरी मिळावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

कोट ः
कोकण रेल्वेमार्गावरील सौंदळ येथे व्हॉल्टस्टेशन असल्याने त्या ठिकाणी काही मोजक्या गाड्या थांबतात. मात्र, या रेल्वेस्टेशनला पूर्ण स्थानकाचा दर्जा मिळाल्यास कोकण रेल्वेमार्गावर धावणाऱ्‍या अनेक गाड्या थांबून त्याचा फायदा प्रवाशांना होणार आहे. या कोकण रेल्वे प्रशासनाने प्राधान्याने सकारात्मक विचार करावा.
-प्रथमेश पाटील, प्रवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com