कोविड काळातील 2 कोटी थकबाकीचा बोजा पालिकेवर

कोविड काळातील 2 कोटी थकबाकीचा बोजा पालिकेवर

rat०२३४.txt

(पान ३ साठी)

पाणीपट्टी न भरल्यास नळजोडणी तोडणार

रत्नागिरी पालिका ; कोविडमधील २ कोटी थकबाकीचा बोजा

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ ः रत्नागिरी पालिकेवर कोविड काळातील पाणीपट्टी वसुलीचा २ कोटीचा बोजा कायम आहे. त्यात या आर्थिक वर्षातील पाणीपट्टी २ कोटी असे ४ कोटी वसुलीचे मोठे उद्दिष्ट पालिकेच्या पाणी विभागासमोर आहे; परंतु पाणी विभागाने चांगली कामगिरी करत ५० टक्के वसुली केली आहे. या महिन्याच्या १५ तारखेला थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात येणार आहेत. त्या मुदतीत पाणीपट्टी न भरल्यास नळजोडणी तोडण्याचा इशारा पालिकेने दिला आहे.

घरपट्टी, पाणीपट्टी पालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचे मुख्य साधन आहे. हे कर शंभर टक्के वसूल झाल्यास पालिकेला मोठा आर्थिक हात मिळतो; परंतु कोरोना काळानंतर पालिकेच्या या करांच्या वसुलीवरही मोठा परिणाम झाला. पाणीपट्टी वसुलीचे २ कोटीचे उद्दिष्ट पालिकेला दरवर्षी असते; मात्र कोरोना काळात २ कोटी पाणीपट्टी अद्याप थकित असल्याने पालिकेवर त्याचा बोजा पडला आहे. या आर्थिक वर्षातील २ कोटी आणि थकित २ कोटी अशा ४ कोटी पाणीपट्टी वसुलीचे टार्गेट पालिकेसमोर आहे. पाणी विभागाने त्यापैकी २ कोटी रुपये वसूल केले आहेत आणि या महिन्यात उर्वरित २ कोटी वसूल करून १०० टक्के पाणीपट्टी वसुलीचे लक्ष्य पाणी विभागाने ठेवले आहे.
शहरामध्ये एकूण १० हजार ८८५ नळजोडणी धारक आहेत. त्यांच्याकडून पाणीपट्टीच्या मध्यमातून २ कोटीचा महसूल पालिकेला मिळतो; परंतु या वेळी पाणी विभागाला थकित पाणीपट्टी धरून ४ कोटीची थकबाकी वसूल करायची आहे.

दृष्टीक्षेपात...
* एकूण नळधारक १० हजार ८८५
* दरवर्षीचे उद्दिष्ट २ कोटी
* १५ फेब्रुवारीला बजावल्या जाणार नोटिसा
* मुदतीत पाणीपट्टी न भरल्यास जोडणी तोडणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com