Mon, June 5, 2023

लाचखोर एजंट, ऑपरेटरला पोलिस कोठडी
लाचखोर एजंट, ऑपरेटरला पोलिस कोठडी
Published on : 2 February 2023, 3:46 am
rat०२४८.txt
बातमी क्र. ४८ (पान ३ साठी)
लाचप्रकरणी एजंट, ऑपरेटरला कोठडी
रत्नागिरी, ता. २ : पासपोर्ट देण्यासाठी ४५ हजाराची लाच घेणाऱ्या एजंट आणि मुंबई पासपोर्ट कार्यालयातील डाटा ऑपरेटरला न्यायालयाने ५ दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाने रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले होते. त्यानंतर गुन्हा दाखल करून अटक केली होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती, शेखर मुरलीधर नेवे (रा. पश्चिम मुंबई) हे खासगी एजंट आणि पासपोर्ट कार्यालयातील डाटा ऑपरेटर प्रकाश मंडल अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. रत्नागिरीतील एका तक्रारदाराने ही तत्कार दाखल केली होती. त्यानुसार बुधवारी (ता. १) रेल्वे स्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये सापळा रचून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली होती.