पवारवर अखेर खुनाचा गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पवारवर अखेर खुनाचा गुन्हा
पवारवर अखेर खुनाचा गुन्हा

पवारवर अखेर खुनाचा गुन्हा

sakal_logo
By

80078
आंबोली : येथे आज पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी दाखल होत घटनास्थळाची पाहणी केली.

पवारवर अखेर खुनाचा गुन्हा

आंबोली घाटातील प्रकरण; मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात

सावंतवाडी, ता. २ ः पंढरपूर येथील सुशांत आप्पासो खिल्लारे (वय २६) यांचा खून करून मृतदेह आंबोली घाटात टाकल्याप्रकरणी तुषार शिवाजी पवार (रा. कऱ्हाड) याच्यावर येथील पोलिस ठाण्यात खुनासह अपहरण करणे, पुरावा नष्ट करणे तसेच ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला. या प्रकरणाचा पुढील तपास करण्यासाठी गुन्हा उपविभायीग पोलिस अधिकारी रोहिणी सोळंके यांच्याकडे वर्ग करण्यात आला. पहाटे शवविच्छेदन अहवालानंतर खिल्लारे याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला; मात्र व्हिसेरा राखून ठेवल्याची माहिती पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी दिली.
अधिक माहिती अशी की, आर्थिक व्यवहारातून खिल्लारे याचा खून झाला होता. मृतदेह फेकताना भाऊसो अरुण माने याचा दरीत पडून मृत्यू झाला होता. या प्रकरणाचा पवार प्रत्यक्ष साक्षिदार होता. दरम्यान, आज खिल्लेरे याचे नातेवाईक आज दोन दिवसांनी सावंतवाडीत दाखल झाले. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार येथील पोलिस ठाण्यात सकाळी सातला खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचप्रमाणे अपहरण करणे, डांबून ठेवणे, पुरावा नष्ट करणे यांसह अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याचे मेंगडे यांनी सांगितले. ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे हा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सोळंके यांच्याकडे वर्ग केल्याचेही सांगितले. संबंधित खिल्लारे याचे आजोबा व चुलत मामा असे नातेवाईक आले; परंतु त्यांनी कोणतीही तक्रार नसल्याचे सांगितले. हा सर्व प्रकार आर्थिक व्यवहारातून झाला आहे. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल व प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या उपस्थितीत आज आंबोली येथे घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. यावेळी हवालदार दत्ता देसाई, अभिजित कांबळे, राजेश नाईक, दीपक शिंदे उपस्थित होते.