ऑन्कोतर्फे महिलांसाठी मोफत मॅमोग्राफी तपासणी शिबिर

ऑन्कोतर्फे महिलांसाठी मोफत मॅमोग्राफी तपासणी शिबिर

rat०३१५.txt
(टुडे पान २ साठी)
(टीप-जाहिरातदार आहेत.)

ऑन्कोतर्फे मोफत कर्करोग तपासणी शिबिर

चिपळूण, ता. ३ ः महिलांमध्ये आढळून येणारे कॅन्सरचे प्रमाण लक्षात घेता येथील ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटरतर्फे जागतिक कर्करोग दिनानिमित्त खास महिलांसाठी मोफत कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. सोमवारी (ता.६) फेब्रुवारीला सकाळी १० ते ३ या वेळेत हे शिबिर भरवण्यात येणार आहे. या शिबिराच्या माध्यमातून स्तनाचा आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची मोफत स्क्रिनिंग तपासणी करण्यात येईल. ३५ वर्षांवरील अधिक महिलांची मोफत मॅमोग्राफी तपासणी करणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील हे ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटर येथे एकमेव मेमोग्राफी सेंटर आहे. शिबिरात स्त्री कर्करोगतज्ञ डॉ. तेजल गोरासिया आणि डॉ. आत्माराम चौधरी महिलांची वैद्यकीय तपासणी करतील. महिलांमधील कर्करोगाची समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. अनेक महिला सततच्या होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे आजाराची लक्षणे बळावतात. यामुळे गर्भाशय, स्तनांशी निगडित महिलांना त्रास जाणवत असेल तर त्याकडे महिलांनी दुर्लक्ष करू नयेत. अचानक रक्त पांढरे होणे, भूक न लागणे, शरीरात कोठेही अचानक गाठ किंवा बरा न होणारा व्रण तयार होणे, उतारवयात मासिक पाळी थांबल्यावर रक्तस्राव होणे, स्तनांमध्ये गाठ, व्रण होणे, आवाज बदलणे, आवाज बसणे, खोकल्यातून रक्त पडणे, अन्न गिळताना अडकल्यासारखे वाटणे, पोट जड वाटणे, न पचलेले अन्न उलटणे, तोंडात न दुखणारा चट्टा, व्रण अथवा गाठ तयार होणे, लघवीतून किंवा शौचातून रक्तस्राव, बद्धकोष्ठतेची तक्रार, काखेत, जांघेत, गळ्यात, कडक गाठींचे अवधाण येणे, अशी लक्षणं जाणवत असल्यास त्यांनी तत्काळ या शिबिरात सहभागी होऊन आपली संपूर्ण तपासणी करून घ्यावी, असेही आवाहन ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटरतर्फे करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com