कुडाळमध्ये ''स्वाहाकार याग'' उत्साहात

कुडाळमध्ये ''स्वाहाकार याग'' उत्साहात

swt३५.jpg
८०१५१
कुडाळः भाविकांच्या अलोट गर्दीत येथील श्री गवळदेव मंदिरात ॠग्वेद संहिता स्वाहाकार याग सुरू आहे.
(छायाचित्रः अजय सावंत)

कुडाळमध्ये ''स्वाहाकार याग'' उत्साहात
भाविकांची गर्दी ः ''चक्रीभजनाचा महासंग्राम'' ठरला लक्षवेधी
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. ३ ः भाविकांच्या अलोट गर्दीत भक्तिमय वातावरणात येथील श्री गवळदेव मंदिरात ॠग्वेद संहिता स्वाहाकार याग सोहळा साजरा झाला. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांसह चक्रीभजनाचा महासंग्राम खास आकर्षण ठरला.
येथील श्री गवळदेव मंदिराच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त १ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत ॠग्वेद संहिता स्वाहाकार याग सोहळा आयोजित केला आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काल (ता. २) स्थापित देवता पूजन, ॠग्वेद शाकल संहिता स्वाहाकार, दुपारी नैवेद्य, आरती व तीर्थप्रसाद, अष्टावधान सेवा, सायंकाळी आरती, राजू मुंडले यांचे सुश्राव्य कीर्तन आदी कार्यक्रम झाले. तर आज सकाळी स्थापित देवता पूजन, ॠग्वेद शाकल संहिता स्वाहाकार, दुपारी नैवेद्य, आरती व तीर्थप्रसाद, दुपारी राजू मुंडले यांचा जागर, आरती, त्यानंतर चक्रीभजनाचा महासंग्राम हा कार्यक्रम झाला. उद्या (ता. ४) सकाळी ७.३० वाजता स्थापित देवता पूजन, ॠग्वेद शाकल, संहिता स्वाहाकार, दुपारी १ वाजता नैवेद्य, आरती व तीर्थप्रसाद, दुपारी ४ ते ६ सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता आरती, रात्री ७.३० ते ९ सातेरी ग्रुप भजन, रात्री ९ ते ११ वारकरी भजन, रविवारी (ता. ५) सकाळी ७.३० वाजता स्थापित देवता पूजन, ॠग्वेद शाकल संहिता, स्वाहाकार, दुपारी १ वाजता नैवेद्य, आरती व तीर्थप्रसाद, दुपारी ४ ते ६ सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी ७ वाजता आरती, रात्री ८ ते १० ''वृंदावनी वेणू'', सोमवारी (ता. ६) सकाळी ७.३० वाजता स्थापित देवता पूजन, ॠग्वेद शाकल संहिता स्वाहाकार, सकाळी ९ वाजता धार्मिक विधी, ११.३० वाजता बलिदान, दुपारी १२ वाजता पूर्णाहूती, अभिषेक सांगता, नैवेद्य, आरती, प्रार्थना, आशीर्वाद, समाराधना, १ वाजता नैवेद्य, आरती व तीर्थप्रसाद, दुपारी ४ ते ६ श्री गवळदेव कुपन लकी ड्रॉ, सायंकाळी ७ वाजता आरती, रात्री ७.३० ते ९ नामस्मरण व महिला मंडळाचे भजन, रात्री ९ ते ११ वाजता श्री ब्राम्हण देव भजन मंडळाचे भजन, मंगळवारी (ता. ७) सकाळी ८ ते १२.३० वाजता श्री गवळदेव चरणी लघुरुद्र, वार्षिक अनुष्ठान, नैवेद्य, आरती, प्रसाद, दुपारी १ ते ४ महाप्रसाद, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ (सद्गुरू वामनराव पै सत्संग), सायंकाळी ७ वाजता आरती), ७.३० ते ८.३० सिध्दिविनायक भजन मंडळ गांधी चौक कुडाळ यांचे भजन, सायंकाळी ९ ते १० पालखी प्रदक्षिणा, रात्री १०.३० वाजता खानोलकर दशावतार नाट्यमंडळाचा ''दीप माझा वंशाचा'' नाट्यप्रयोग, बुधवारी (ता. ८) सायंकाळी ४ वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळाचा ट्रिकसीनयुक्त ''स्वामी अन्नपूर्णा'' नाट्यप्रयोग आदी कार्यक्रम होणार आहेत. सर्व भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री गवळदेव उत्सव समिती व श्री गवळदेव मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
.................

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com