79 वर्षानंतर होणारे सहभोजन ठरणार आदर्शवत

79 वर्षानंतर होणारे सहभोजन ठरणार आदर्शवत

rat०३१२.txt

(पान २ साठी, अॅंकर)

फोटो ओळी
-rat३p१.jpg-
८०१२९
रत्नागिरी ः एकत्रित सहभोजनाच्या नियोजनासाठी पतितपावन मंदिरात झालेल्या बैठकीला उपस्थित नागरिक.
---

७९ वर्षानंतरचे सहभोजन ठरणार आदर्शवत

पतितपावन मंदिर ; कार्यकर्त्यांची नियोजनाची बैठक
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३ ः येथील पतितपावन मंदिरात २४ फेब्रुवारीला सर्व समाजाच्या एकत्रित सहभोजनाच्या नियोजनासाठी गुरुवारी (ता. २) पतितपावन मंदिरात बैठक झाली. यामध्ये अनेकांनी सढळहस्ते सार्वजनिक कार्यात मदत जाहीर केली आहे. काहींनी धान्य दिले तर काहींनी देणगी जाहीर केली आहे. त्यामुळे ७९ वर्षानंतर पतितपावन मंदिरमध्ये होणाऱ्या हा सहभोजनाचा कार्यक्रम आदर्शवत ठरणार आहे.
दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर यांच्या निधनानंतर पतितपावन मंदिरातील बंद पडलेला सहभोजन आणि सहभजनाचा कार्यक्रम अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ, पतितपावन मंदिर ट्रस्ट आणि रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघ यांच्या माध्यमातून पुन्हा सुरू होणार आहे. या कार्यक्रमासाठी सहभोजन व भजन कमिटी बनवण्यात आली आहे. ५० निवडक कार्यकर्त्यांची प्राथमिक नियोजनाची बैठक पतितपावन मंदिरामध्ये झाली. सर्व कमिटी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी नगरसेवक नितीन तळेकर यांच्या अध्यक्षतेखाली या कमिटीची स्थापना करण्यात आली. भंडारी समाजाचे अध्यक्ष रूपेंद्र शिवलकर यांनी सर्व कार्यकर्त्यांना कामाची जबाबदारी देऊन सहभोजनाचे नियोजन समजावून सांगितले. कार्यकर्त्यांच्या आलेल्या सूचनांवरही या वेळी चर्चा करण्यात आली.
त्या काळी देश स्वतंत्र करण्यासाठी स्पृश्य, अस्पृश्य भेदभाव मिटवण्यासाठी सहभोजनाची आवश्यकता होती; परंतु आता देशभक्ती, धर्माचे रक्षण आणि प्रामाणिकपणा, दानशूरता अंगीकारण्यासाठी सर्व समाजाने एकत्र येण्याची गरज आहे, असे मत राजीव कीर यांनी व्यक्त केले. त्यासाठी हा सहभोजन कार्यक्रम आदर्शवत ठरेल. महाभारतातील कर्णालाही लाजवेल असे भागोजीशेठ कीर यांचे कार्य भजनाच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्यात येणार आहे. भागोजीशेठ कीर यांचे कार्य सर्व समाजांच्या माध्यमातून पुढे नेले जाणार आहे. या वेळी पतितपावन ट्रस्टचे अध्यक्ष उन्मेष शिंदे, मंदार खेडेकर, भंडारी समाजाचे अध्यक्ष रूपेंद्र शिवलकर, राजीव कीर, नितीन तळेकर, बाबा नागवेकर, संपदा तळेकर, पल्लवी पाटील, सुश्मिता सुर्वे, जयेश गुरव, दया चवंडे, मनिषा बामणे, दिलीप मयेकर, विनोद वायंगणकर, बंटी कीर, राजन शेट्ये, कृष्णकांत नांदगावकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते, बंधूभगिनी उपस्थित होते.
--
यांनी दिले योगदान
या सहभोजनासाठी सिद्धिविनायक ट्रस्टचे माजी अध्यक्ष सुभाष मयेकर यांनी ३०० किलो तांदूळ दिला आहे, तर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर यांनी ५० किलो तूरडाळ आणि ५० किलो कडधान्य देऊ केले आहे. सहभोजनासाठी लागणारे लोणचे भिडे उद्योग समुहाकडून देण्यात आले आहे. अखिल भारतीय भंडारी समाज महासंघाचे अध्यक्ष नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्याकडून ५१ हजाराची देणगी जाहीर केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com