नेवरे येथे गजानन महाराज प्रकट दिन 7 पासून

नेवरे येथे गजानन महाराज प्रकट दिन 7 पासून

rat०३३७.TXT

(पान २ साठी)

नेवरेत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा

रत्नागिरी, ता. ३ ः तालुक्यातील नेवरे लावगणवाडी येथील श्री गजानन महाराज मंदिरात प्रकट दिन सोहळा ७ ते १३ फेब्रुवारी या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमाने साजरा करण्यात येणार आहे.
मंगळवारी ७ फेब्रुवारीपासून कार्यक्रमांना प्रारंभ होईल. पहिल्या दिवशी काकड आरती, पंचामृती पूजा, अभिषेक, दुपारी ३ वा. हळदीकुंकू व रात्री १०.३० वा. श्री गजानन महाराज नमन मंडळ नेवरे लावगणवाडी यांचे नमन आहे. ८ ला आरती, श्रींची पूजा व अभिषेक त्यानंतर श्रींची पालखी मिरवणूक-स्थानिक देवस्थान भेट त्यानंतर १०.३० वा. पालखी लांजा तालुक्यातील गवाणे येथील सूर्यकांत करंबले यांच्याकडे प्रस्थान करेल. ९ला सकाळी ७ वा. श्रींची पूजा, श्री अक्कलकोट स्वामी सेवा केंद्र येथे पालखीचे आगमन होईल. नेवरेफाटा येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे पालखीचा मुक्काम राहणार असून, भजनाचा कार्यक्रमही होणार आहे. १० ला सकाळी श्रींची पूजा, पालखी मिरवणूक (नेवरे लावगणवाडी), सायंकाळी संजय हर्षे यांचे घरी पालखी मुक्काम राहणार आहे. ११ ला श्रींची पूजा, पालची मिरवणूक, भजन, आरती हाणेार आहे. १२ ला काकड आरती, पंचामृत पूजा व अभिषेक, मूर्ती वर्धापन दिन, भक्तनिवास भूमिपूजन सोहळा, महाप्रसाद व त्यानंतर हभप महेश सरदेसाई यांचे कीर्तन होणार आहे. १३ ला रात्री १२.३० वा. श्री गजान विजय ग्रंथाचे पारायणास प्रारंभ होणार आहे. सकाळी महाअभिषेक, त्यानंतर महाप्रसाद, भजन, बक्षिस वितरण सोहळा व रात्री श्री सोळजाई नाट्यनमन मंडळ, देवरूख कोल्हेवाडीतर्फे नमन सादर करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com