Fri, March 24, 2023

वन वणवा प्रतिबंध सप्ताह
वन वणवा प्रतिबंध सप्ताह
Published on : 4 February 2023, 12:39 pm
80268
हरकुळ खुर्द : येथील प्रशालेत वनविभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वन वणवा प्रतिबंधाबाबतची माहिती दिली.
वन वणवा प्रतिबंध सप्ताह
कणकवली : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा हरकुळ खुर्द येथे वन विभागातर्फे वन वणवा प्रतिबंधाबाबतची माहिती देण्यात आली. वन विभागाचे अधिकारी अ.भी.जाधव, अतुल खोत, श्री. शेगावे, अतुल पाटील, अनिल राख, बबन बागवे, चंद्रकांत लाड यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जंगलात लागणारा वणवा, मानव व वन्यजीव यांच्यातील संघर्ष याबाबत मार्गदर्शन केले. तसेच चित्रफित दाखवली.