पिंगुळीमध्ये चोरीचा प्रयत्न हाणून पाडला

पिंगुळीमध्ये चोरीचा प्रयत्न हाणून पाडला

पिंगुळीमध्ये चोरीचा
प्रयत्न हाणून पाडला
कुडाळ, ता. ३ः हातचलाखी करत चोरीचा प्रकार पिंगुळी येथे आज घडला. जिल्ह्यात परप्रांतातील चोरटे सक्रिय झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सतर्कतेचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा मनसे पदाधिकारी दीपक गावडे यांनी केले.
गावडे यांच्या म्हणण्यानुसार, जिल्ह्यात उद्या (ता. ४) होणाऱ्या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होत आहेत. या यात्रेसाठी लाखो भाविक कोकणरेल्वे, एसटी बस, खासगी बसने दाखल होत आहेत. गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारी टोळकीही जिल्ह्यात दाखल झाल्याचा संशय आहे. याचा प्रत्यय पिंगुळीत आज आला. काही परप्रांतीय महिलांच्या टोळक्याने पिंगुळी येथील स्थानिक महिलेच्या दुकानात जाऊन हातचलाखीने पैसे आणि निरमा पावडरच्या माळा चोरल्याची घटना घडली. यावेळी सतर्क असलेले मनसे कार्यकर्ते गावडे तसेच स्थानिक नागरिक दया मेस्त्री, सुंदर गावडे, राजन धुरी, विजय परब, संजय परब, समीर सराफदार, समीर मयेकर, संदेश करंगुटकर, मंदार शारबिद्रे यांनी या महिलांच्या टोळक्याची माहिती कुडाळ पोलिस ठाण्यात दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com