कुडाळनगरीत भाविकांची मांदियाळी

कुडाळनगरीत भाविकांची मांदियाळी

80345
कुडाळ ः श्री गवळदेवचे दर्शन घेताना भाविकांसह उत्सव समिती व मित्रमंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते. (छायाचित्र ः अजय सावंत)


कुडाळनगरीत भाविकांची मांदियाळी

गवळदेव वर्धापन; स्वाहाकार याग सोहळ्याने वातावरण भक्तिमय

कुडाळ, ता. ४ ः येथील श्री गवळदेव मंदिरात ॠग्वेद संहिता स्वाहाकार याग सोहळ्याच्या निमित्ताने विविध कार्यक्रम भाविकांच्या अलोट गर्दीत पार पडत आहेत. उद्या (ता. ५) ‘वृंदावनी वेणू’ हा अनोखा कार्यक्रम रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
येथील श्री गवळदेव मंदिर येथे मंदिराच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त १ ते ७ फेब्रुवारी या कालावधीत ॠग्वेद संहिता स्वाहाकार याग सोहळ्याचे आयोजन केले आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये आज सकाळी स्थापित देवतापूजन, ॠग्वेद शाकल संहिता स्वाहाकार, दुपारी नैवेद्य, आरती व तीर्थप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम, आरती, सातेरी ग्रुप भजन, वारकरी भजन आदी कार्यक्रम भाविकांच्या उपस्थितीत झाले. उद्या (ता. ५) सकाळी स्थापित देवतापूजन, ॠग्वेद शाकल संहिता स्वाहाकार, दुपारी नैवेद्य, आरती व तीर्थप्रसाद, सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी आरती, रात्री ‘वृंदावनी वेणू’ कार्यक्रम होणार आहे. यामध्ये बासरी वादक तुषार आसोलकर बासरी वादन सादर करणार असून त्यांना पखवाज साथ विशाल राणे करणार आहेत. सोमवारी (ता. ६) सकाळी स्थापित देवतापूजन, ॠग्वेद शाकल संहिता स्वाहाकार, धार्मिक कार्यक्रम, बलिदान, दुपारी पूर्णाहूती, अभिषेक सांगता, नैवेद्य, आरती, प्रार्थना, आशीर्वाद, समाराधना, नैवेद्य, आरती व तीर्थप्रसाद, श्री गवळदेव कुपन लकी ड्रॉ, सायंकाळी आरती, रात्री नामस्मरण व महिला मंडळाचे भजन, श्री ब्राह्मण देव मंडळाचे भजन होईल.
---
इतर काही कार्यक्रम
मंगळवारी (ता. ७) सकाळी श्री गवळदेव चरणी लघुरुद्र आदी वार्षिक अनुष्ठान, नैवेद्य, आरती, प्रसाद, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी हरिपाठ-सद्‌गुरू वामनराव पै सत्संग, आरती, सिद्धिविनायक मंडळ गांधी चौक कुडाळ यांचे भजन, पालखी प्रदक्षिणा, रात्री खानोलकर दशावतार नाट्यमंडळाचा ‘दीप माझा वंशाचा’ नाट्यप्रयोग, बुधवारी (ता. ८) दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळाचा ट्रिकसीनयुक्त ‘स्वामी अन्नपूर्णा’ नाट्यप्रयोग आदी कार्यक्रम होणार आहेत. तरी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री गवळदेव उत्सव समिती, श्री गवळदेव मित्रमंडळाने केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com