धोकादायक ठरणाऱ्या चिरेखाणींतून शाश्वत उत्पन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धोकादायक ठरणाऱ्या चिरेखाणींतून शाश्वत उत्पन्न
धोकादायक ठरणाऱ्या चिरेखाणींतून शाश्वत उत्पन्न

धोकादायक ठरणाऱ्या चिरेखाणींतून शाश्वत उत्पन्न

sakal_logo
By

जांभा दगड मोलाचा भाग ३........लोगो

rat4p21.jpg
L80381
पावसः आसिफ सावकार यांनी पडक्या खाणीत केलेली आंबा लागवड.
rat4p22.jpg
80382
पडक्या खाणीत आणि शेजारील भागात केलेली लागवड, आंतरपिक म्हणून तुरी लागवड केली आहे.
rat4p20.jpg
80380
आसिफ सावकार
------------

धोकादायक ठरणाऱ्या चिरेखाणींतून शाश्वत उत्पन्न
आसिफ सावकार यांचा प्रयोग; कलम लागवड, तुरीचे आंतरपीक
रवींद्र साळवीःसकाळ वृत्तसेवा
लांजा, ता. ४ः चिरेखाणी उघड्या, मोकळ्या असतात. अशा चिरेखाणी काहीवेळा धोकादायक ठरण्याची शक्यता असते. अशा स्थितीमध्ये त्या मोकळ्या पडीक चिरेखाणींचा खुबीने उपयोग केल्यास त्यातून उत्पन्नाचा नवा शाश्‍वत स्रोत निर्माण होवू शकतो हे पावस येथील आसिफ करीम सावकार यांनी प्रत्यक्ष कृतीद्वारे साऱ्यांना दाखवून दिले आहे. तसेच या चिरेखाणींचा उपयोग जलसंधारणासाठी वा शेततळ्यासारखाही होऊ शकतो.
चिऱ्यांच्या उत्खननानंतर या चिरेखाणी बुजविण्याच्या अटीवर चिरेखाण चालक वा मालकांना प्रशासनाकडून परवानगी दिली जाते. मात्र, अनेक ठिकाणी या चिरेखाणी न बुजविता उघड्या असल्याचे चित्र दिसते. पावसाळ्यामध्ये पाण्याने भरलेल्या या चिरेखाणीचा अंदाज न आल्याने काही वेळा एखाद्या व्यक्तीचा अथवा जनावराचा त्यामध्ये बुडून मृत्यू होण्याचा संभव असतो. त्यामुळे उघड्या राहून धोकादायक ठरणाऱ्या या पडीक चिरेखाणीचा कल्पकतेने उपयोग करून उत्पन्नाचा नवा शाश्‍वत स्रोत निर्माण करता येवू शकतो हे आसिफ सावकार आणि कुटुंबियांनी दाखवून दिले आहे. सावकार यांची चिरेखाण पावस जवळील नाखरे या गावी आहे. ते या व्यवसायात सुमारे तीस वर्षे आहेत. चिरेखाण ही रस्त्यालगत असल्याने दगड (चिरा) उत्खनन झाल्यावर बंद झाल्यावर या खाणीत माती आणि दगड ढकलून देऊन जनावरांना किंवा अन्य लोकांना कुठला त्रास होऊ नये म्हणून काळजी घेतली होती. वीस फूट खोलीची ही जागा सतरा फुटांपर्यंत भरलेली होती. एके रात्री ही जागा किती दिवस पाडून ठेवायची या विचारात असताना या जागेत आपण आंबा कलम लागवड केली तर असा विचार पुढे आला. यासाठी खोलगट जमिन समपातळीत करून या जमिनीत गुंठ्यांत आंबा कलम लावण्यात आले. लागवड केल्यानंतर ५ वर्षांत फळं धरायला लागली. पावसाळ्यात मुरलेले पाणी झाडांना जिवंत ठेवण्यामध्ये मदत करते त्यामुळे झाडे लागवडीनंतर पाणी घालण्याचा प्रश्नच भेडसावला नाही.

कोट
जांभा दगडाच्या उत्खननानंतर या जागेवर जुनपर्यंत ओलावा असतो. त्यावर माती टाकल्याने ओलावा टिकून राहतो. यामध्ये एक वर्षाची झाडे तीन वर्षांची वाटतात. सावकार यांचा चिरेखाणीतील प्रयोग बघून अनेक शेतकरी, खाणमालक पुढे आले आहेत.
- आसिफ सावकार, पावस

चौकट-
शेळ्यासाठी उपयुक्त गवत
या जागेत आंतरपीक म्हणून तुरीची लागवड केली आहे. याशिवाय शेळ्यासाठी उपयुक्त गवताची लागवड केली आहे. जागेच्या भोवताली नारळाच्या झाडांची लागवड केली आहे. चिरेखाणीत लागवड केलेल्या झाडांवर अधिक खर्च करावा लागत नाही. कारण या झाडांना पावसाळ्यात मुरलेले पाणी आपोआप मिळत राहते, असे सावकार यांनी निरिक्षण नोंदले आहे.