जिल्ह्यात उद्यापासून मोबाईल लोकअदालत

जिल्ह्यात उद्यापासून मोबाईल लोकअदालत

जिल्ह्यात उद्यापासून मोबाईल लोकअदालत

डी. बी. म्हालटकर ः ‘न्याय आपल्या दारी’ संकल्पनेतून जागृती

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. ३ ः महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या सूचनेनुसार ६ फेब्रुवारी ते ४ मार्च या कालावधीत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत ‘न्याय आपल्या दारी’ संकल्पनेतून मोबाईल लोकअदालत व फिरते विधी सेवा केंद्र या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात मोबाईल व्हॅनद्वारे कायदेविषयक जनजागृती शिबिरे व मोबाईल लोकअदालती घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यात कणकवली, वैभववाडी, सावंतवाडी, मालवण, देवगड, दोडामार्ग, वेंगुर्ले, कुडाळ व ओरोस या ठिकाणी कायदेविषयक जनजागृती मार्गदर्शन शिबिरे व मोबाईल लोकअदालतीचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात मोबाईल व्हॅनचा प्रारंभ सोमवारी (ता. ६) जिल्हा न्यायालय येथून होणार आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डी. बी. म्हालटकर यांनी दिली.
मोबाईल लोकअदालतीचे रानबांबुळी, पिंगुळी, बांदा, वझरे, शिरोडा, कांदळगाव, जामसांडे, खारेपाटण व ग्रामन्यायालय वैभववाडी येथे घेण्यात येणार आहेत. मोबाईल व्हॅन लोकअदालतीमध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने कायमचे मिटवावेत, असे आवाहन केले आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत देण्यात येणाऱ्या मोफत कायदेविषयक सेवांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी मोबाईल व्हॅनद्वारे गावातील लोकांमध्ये कायदेविषयक जनजागृती करण्यासाठी तालुक्यातील अणाव, आकेरी, चराठा, इन्सुली, सासोली, परबवाडा, आरवली, वायंगणी, कोळंब, इळये, शिरगाव, शिवडाव, कोकिसरे व नरडवे या गावांमध्ये वेगवेगळ्या विषयांवर कायदेविषयक शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच १० एप्रिलला होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सहभागी होऊन आपले वाद सामोपचाराने कायमचे मिटवावेत. विधी सेवा प्राधिकरणामार्फत देण्यात येणाऱ्या मोफत कायदेविषयक सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन म्हालटकर यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com