
पथसंचलन
rat०४२९.TXT
(पान ५ साठी, संक्षिप्त)
आज सघोष पथसंचलन
रत्नागिरी : दक्षिण रत्नागिरी राष्ट्रसेविका समितीच्या वतीने बढते चले बढते चले इस ध्येय पथ पर आज हम या घोष वादनाच्या तालात भगव्या ध्वजाच्या नेतृत्वाखाली संपूर्ण गणवेशधारी सेविकांचे संचलन पाहण्याची संधी रत्नागिरीकरांना मिळणार आहे. उद्या (ता. ५) टिळकनगर उद्यान (पटवर्धन वाडी) येथून सायंकाळी ४.०० वाजता संचलन सुरू होऊन पटवर्धन वाडी, मारूती मंदिर, आरोग्य मंदिर, मजगाव रोड, पटवर्धन वाडी येथून पुन्हा टिळक नगर उद्यान येथे येणार आहे. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या वीणा लेले, राष्ट्र सेविका समिती जिल्हा कार्यवाहिका अपर्णा आठवले मार्गदर्शन करणार आहेत. नागरिकांनी संचलनाचे स्वागत करावे, असे आवाहन जिल्हा सहकार्यवाहिका मीरा भिडे, शहर कार्यवाहिका शमिका गद्रे यांनी केले आहे.
----------
फोटो ओळी
- rat४p२३.jpg-
८०३८३
नाणीज ः उद्घाटनप्रसंगी किरणशेठ सामंत यांना मानपत्र देताना विनोद भागवत, शेजारी बाबूशेठ म्हाप, सरपंच गौरव संसारे, संजय कांबळे विनायक शिवगण व मंडळाचे कार्यकर्ते.
---------------
नाणीजला टेनिस क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
रत्नागिरी ः तालुक्यातील नाणीज येथील धावजेश्वर चषक ओपन टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष व प्रसिद्ध उद्योजक किरण सामंत याच्या हस्ते झाले. या वेळी त्यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
नवतरुण मित्रमंडळ नाणीजच्यावतीने या स्पर्धांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष विनोद भागवत, बाबूशेठ म्हाप, गौरव संसारे, संजय कांबळे, पोलिस पाटील नितीन कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष दत्ताराम खावडकर, सदस्य विनायकशेठ शिवगण, राजन बोडेकर यांच्यासह मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र दर्डी यांनी केले. या प्रसंगी उद्योजक किरणशेठ सामंत म्हणाले, ग्रामीण भागात कोणत्याही सुविधा नसताना चांगल्या पद्धतीने खेळ खेळले जातात. या गुणी खेळाडूंच्या पाठीमागे आपण सदैव आहोत. या प्रसंगी बाबू म्हाप म्हणाले, खेळाडूंनी खेळात जर सातत्य ठेवले तर चांगला खेळ होऊ शकतो.
---
फोटो ओळी
-rat४p२८.jpg-
८०४०७
दुर्गेश आखाडे
--------------
भागोजी ट्रस्टचा पत्रकारिता पुरस्कार आखाडे यांना जाहीर
रत्नागिरी ः मुंबईतील भागोजी चॅरिटेबल ट्रस्टचा पत्रकारिता विशेष पुरस्कार येथील पत्रकार दुर्गेश आखाडे यांना जाहीर झाला आहे. येत्या १२ फेब्रुवारीला सायंकाळी साडेचार वाजता दादर येथील देवाडिगा सभागृहात मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.
भागोजी चॅरिटेबल ट्रस्ट दरवर्षी पत्रकारिता, सामाजिक, कला, शैक्षणिक आणि अन्य क्षेत्रामध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या पाचजणांना पुरस्कार देऊन गौरवते. यंदाचा पत्रकारिता विशेष पुरस्कार आखाडे यांना जाहीर झाला आहे. आखाडे गेली २३ वर्षे पत्रकारितेत कार्यरत आहेत. पत्रकारितेबरोबर बालनाट्य, एकांकिका लेखन केले आहे. ज्येष्ठ नाटककार प्र. ल. मयेकर यांच्या कारकिर्दीवर प्र. ल. या माहितीपटाचे लेखनही केले आहे. कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी शाखेचे युवक अध्यक्षपद ते सांभाळत आहेत. त्याचबरोबर दी पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशन या राज्यस्तरीय पत्रकार संघटनेचे दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याचे ते अध्यक्ष आहेत.
---
सीए फौंडेशन परीक्षेत उज्ज्वला क्लासेसचे यश
रत्नागिरी : डिसेंबर २०२२ मध्ये सीए इन्स्टिट्युटतर्फे घेण्यात आलेल्या फाउंडेशन परीक्षेत उज्ज्वला क्लासेसच्या २६ विद्यार्थ्यांनी यश मिळवले. क्लासेसचा निकाल ७६ टक्के लागला. यामध्ये राजीव लालवाणी ३०८ गुण मिळवून पहिला, यशकुमार शाह ३०७ गुण मिळवून दुसरा तर श्रीवाली मर्दा २९८ गुण मिळवून तिसरी आली आहे. या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन उज्ज्वला क्लासचे संचालक पुरुषोत्तम पाध्ये यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचलीस शुभेच्छा दिल्या आहेत. यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे : राजीव लालवानी, यशकुमार शाह, श्रीवाली मार्दा, अथर्व पाटील, मनाली शिरधनकर, सर्वेश इरमल, विश्वराज कोरे, श्रद्धा पोतदार, शशिधर मुदेगोल, मधुरा झगडे, ओम दादुरे, श्रेया दळवी, अवधूत कोपर्डे, मृणाल गोरे, पूजा जोशी, प्रथमेश सुर्वे, सिद्धी मोरे, सुजल पाटील, सारंग बापट, सदिच्छा साळुंखे, प्रेरणा मालू, प्रतीक जोशी, श्रावणी नलावडे, राही नागे, मनाली कुलकर्णी, श्रीराम पेठे.
------
जिल्हा परिषद कर्मचारी वार्षिक स्नेहसंमेलन
रत्नागिरी : कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या जिल्हा परिषदचे २७ वे वार्षिक स्नेहसंमेलन ९ ते ११ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाची सुरूवात ९ फेब्रुवारी रोजी रंगावली व चित्रकला स्पर्धेने होणार आहे. या दिवशी विविध स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ, पाककला स्पर्धा, फनिगेम्स स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. १० रोजी सत्यनारायणाच्या पूजेचेही आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर विविध स्पर्धांचा बक्षिस वितरण समारंभ होणार आहे. यावेळी पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, सुनिल तटकरे, आ.भास्कर जाधव, राजन साळवी, शेखर निकम, योगेश कदम, जिल्हाधिकारी एम.देवेंद्रसिंह, पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव आदी उपस्थित राहणार आहेत. ११ रोजी जि.प. अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा तसेच रात्री ऑर्केस्ट्रा आयोजीत करण्यात आला आहे. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आवाहन जि.प. प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.