गणित अध्यापक मंडळाचे आज पुरस्कार वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणित अध्यापक मंडळाचे
आज पुरस्कार वितरण
गणित अध्यापक मंडळाचे आज पुरस्कार वितरण

गणित अध्यापक मंडळाचे आज पुरस्कार वितरण

sakal_logo
By

80449
जगदीश धोंड, तानाजी साळसकर, चंद्रशेखर सावंत, सचिन पालकर, राजेश जाधव, भाऊसाहेब चवरे, दशरथ शृंगारे

गणित अध्यापक मंडळाचे
आज पुरस्कार वितरण
सावंतवाडी ः सिंधुदुर्ग जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे २०२३ चे सावंतवाडीत तालुक्यातील पुरस्कार जाहीर झाले आहेत. उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून जगदीश धोंड (आरपीडी सावंतवाडी) व तानाजी साळसकर (मळेवा़ड हायस्कूल), तर आदर्श गणित शिक्षक म्हणून चंद्रशेखर सावंत (माजगाव हायस्कूल), सचिन पालकर (इन्सुली हायस्कूल), राजेश जाधव (सुधाताई वामनराव कामत शाळा, सावंतवाडी), उपक्रमशील शिक्षक म्हणून भाऊसाहेब चवरे (माजगाव हायस्कूल), दशरथ शृंगारे (आरपीडी हायस्कूल सावंतवाडी) यांना घोषित करण्यात आले आहेत. सर्व पुरस्कारांचे वितरण उद्या (ता. ५) अनंत केळकर हायस्कूल, वाडा (ता. देवगड) येथे अधिवेशनाच्या दिवशी होणार आहे. या सर्व शिक्षकांचे गणित मंडळाचे अध्यक्ष वामन खोत, सचिव तुकाराम पेडणेकर, परीक्षा प्रमुख औदुंबर भागवत यांनी अभिनंदन केले.
..............
80469
श्री महालक्ष्मी स्थापेश्वर

डेगवे स्थापेश्वर जत्रोत्सव उद्या
बांदा ः प्रतिवर्षाप्रमाणे डेगवे येथील ४८ खेड्यांचे दैवत असलेल्या श्री देव महालक्ष्मी स्थापेश्वर देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव सोमवारी (ता. ६) साजरा होत आहे. यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी श्रींची पूजा आदी धार्मिक विधी होऊन आठपासून देवदर्शन, ओटी भरणे, नवस फेडणे, नवस करणे आदी कार्यक्रमांना सुरुवात होईल. सायंकाळी भजनसेवेचा कार्यक्रम, रात्री ११.३० वाजता पालखी प्रदक्षिणा व त्यानंतर देवेंद्र नाईक संचलित चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ, चेंदवण यांचा ‘पातिव्रत्य तेज’ हा नाट्यप्रयोग सादर होईल. सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव महालक्ष्मी स्थापेश्वर मंदिर ट्रस्ट, डेगवेतर्फे केले आहे.