वारगावचे भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वारगावचे भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेत
वारगावचे भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेत

वारगावचे भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेत

sakal_logo
By

80524
कणकवली ः वारगाव येथील एकनाथ कोकाटेसह भाजपच्या कार्यकर्त्यांना शिवबंधन बांधताना अरविंद सावंत. सोबत विनायक राऊत, वैभव नाईक आदी.

वारगावचे भाजपचे कार्यकर्ते शिवसेनेत
कणकवली,ता. ५ ः खारेपाटण सोसायटीचे संचालक तथा वारगावचे माजी सरपंच आणि विद्यमान सदस्य एकनाथ कोकाटे यांच्या काही कार्यकत्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे खारेपाटण आणि वारगाव पंक्रोशीत भाजपला मोठा धक्का मिळाला आहे. भाजपच्या कार्यप्रणाली कंटाळून शिवसेनेत प्रवेश केला, असे श्री. कोकाटे यांनी सांगितले.
खारेपाठण परिसरात शिवसेनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे काही कार्यकत्यांचा शनिवारी कनेडी येथील शिवसेना कार्यालयात प्रवेशाचा कार्यक्रम झाला. यावेळी भाजपचे शैलेश कोकाटे ,अंकिता कोकाटे, शर्वरी कोकाटे, शोभा पाष्टे ,शुभम पास्टे, प्रमोद केसरकर ,संगीता गांगण आदींनी खासदार विनायक राऊत आणि शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर अतुल रावराणे, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, सुशांत नाईक मधूकर वळंजू, माजी सरपंच बापू नर, शाखाप्रमुख सुनील कुलकर्णी, मयूर केसरकर, अरुण पांचाळ, अंजली पांचाळ आदी उपस्थित होते.