रत्नागिरी-  गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात

रत्नागिरी- गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन
रत्नागिरी, ता. ५ : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. राज्यशास्त्र विभागाच्या वतीने महाविद्यालयात १३ व्या राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमाचे आयोजन केले.
राज्यशास्त्र विभागातील प्रा. नीलेश पाटील यांनी विद्यार्थांनाराष्ट्रीय मतदार दिनाची पार्श्वभूमी, तो साजरा करण्याचा प्रमुख उद्देश, निवडणूक प्रक्रिया इ. ची माहिती सांगून राष्ट्रीय मतदार दिनी घ्यावयाची शपथ दिली. मतदान करणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून, सशक्त, सुदृढ भारताच्या निर्मितीसाठी मतदानाच्या टक्केवारी वाढीबरोबरच उमेदवार निवड गुणवत्ताही वाढली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
भारत शिक्षण मंडळाच्या देव-कीर-घैसास महाविद्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय राष्ट्रीय मतदार दिनाच्या कार्यक्रमात महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागातील विद्यार्थी प्रातिनिधिक स्वरूपात उपस्थित राहिले. गोगटे- जोगळेकर महाविद्यालयातील प्रा. नीलेश पाटील यांचा मतदार नोंदणी, जनजागृती कार्यक्रम महाविद्यालयात उत्तमरीत्या राबविल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी एम. डी. सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीकांत गायकवाड, उपविभागीय अधिकारी डॉ. विकास सूर्यवंशी, तहसीलदार शशिकांत जाधव उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com