
कनेडी हायस्कूलला दोन लॅपटॉप
kan६२.jpg
कनेडी ः दिनेश बोभाटे यांनी संस्थाध्यक्ष सतीश सावंत यांच्याकडे लॅपटॉप दिले.
कनेडी हायस्कूलला दोन लॅपटॉप
कनेडी ः डिजिटल युगात सर्व ठिकाणी संगणकाचा वापर केला जातो. त्याचा शिक्षण क्षेत्रामध्ये तर मोठ्या प्रमाणात केला जातो; मात्र ग्रामीण भागातील विद्यार्थी संगणकापासून वंचित राहतात. हीच गरज ओळखून नाटळ गावचे सुपुत्र, शिवसेना स्थानिक लोकाधिकार समिती संघटक सचिव, विमा कर्मचारी सेना सरचिटणीस, सार्थ प्रतिष्ठान सरचिटणीस दिनेश बोभाटे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून येथील प्रशालेला दोन लॅपटॉप भेट दिले. संस्थाध्यक्ष सतीश सावंत यांच्याकडे हे लॅपटॉप देण्यात आले. येथील प्रशालेत नुकताच हा कार्यक्रम झाला. यावेळी संस्था सरचिटणीस शिवाजी सावंत, खजिनदार प्रकाश सावंत, संचालक नागेश सावंत, प्रशालेचे चेअरमन आर. एच. सावंत, खजिनदार गणपत सावंत, मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुमंत दळवी, पर्यवेक्षक बयाजी बुराण आदी उपस्थित होते.