
संगीत संशयकल्लोळमधून तसबिरीचा घोटाळा यशस्वी
rat०६१०. txt
(टुडे पान ३ साठी, अॅकर)
सं. राज्य नाट्य स्पर्धा---लोगो
फोटो ओळी
-rat६p२.jpg ः
८०७४५
रत्नागिरी ः राज्य नाट्य स्पर्धेत सुयोग कलामंच-गोवा या संस्थेने सादर केलेल्या संगीत संशयकल्लोळ या नाटकातील एक क्षण. (नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
----
संगीत संशयकल्लोळमधून तसबिरीचा घोटाळा यशस्वी
नाट्यपदातून नाटकची सुरवात ढेपाळळी ः सुयोग कलामंच गोवा या संस्थेचा प्रयत्न
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ६ ः राज्य नाट्यस्पर्धेच्या येथील केंद्रावर गोविंद बल्लाळ देवल लिखित संगीत संशयकल्लोळ या विनोदी नाटकाचा प्रयोग झाला. १८९४ ला या नाटकाचा पहिला गद्य प्रयोग झाला. त्यानंतर देवलांनी रचलेली नाट्यपदे घालण्यात आली. या नाटकाचा प्रयोग सुयोग कलामंचने केला. शेखर उसगांवकर दिग्दर्शित या नाटकात विनोदी ढंगाने तसबिरीचा घोटाळा दाखवण्यास संस्था यशस्वी झाली; मात्र नाट्यपदाने नाट्याची सुरवात होत असतानाच ते ढेपाळले. त्यानंतर रंगलेल्या नाटकाला, विनोदी अभिनय, काही नाट्यपदांना रसिकांनी दाद दिली.
---
काय आहे नाटक ?
संगीत संशयकल्लोळ नाटकात चाळीशीनंतर पती-पत्नीमध्ये एकमेकांवरचा संशय आणि तसबिरीचा घोटाळा विनोदी ढगांने मांडण्यात आला आहे. अगदी पत्नी नटूनथटून बाहेर गेली की, फाल्गुनराव पत्नीवर संशय घेतो. एके दिवशी रस्त्याने फाल्गुनराव जात असताना रेवती जी अश्विनशेटची प्रेयसी असते ती रस्त्यात चक्कर येऊन पडते. तिला फाल्गुनराव सावरतात. ती शुद्धीवर येण्यासाठी प्रयत्न करतात. हे सगळं घरामाडीवरील खिडकीतून फाल्गुनरावांची पत्नी कृतिका बघते. तिच्या मनात संशय निर्माण होतो. या आधी अश्विनशेटने आपली तसबीर रेवतीला दिलेली असते. ज्या ठिकाणी रेवती बेशुद्ध पडते त्या ठिकाणी ती पडते तेथे अश्विनशेठची तसबीर फाल्गुनरावाला मिळते ती आपल्याकडे ठेवतो. त्यानंतर घरात आल्यावर पत्नी संशय घेते म्हणून तिला तो तुझ्या प्रियकराचा फोटो असल्याचे सांगतो. नंतर फाल्गुनराव गडी भादव्याला हाताशी धरून अश्विनशेटचा शोध घेतात. अश्विनशेट सापडतोही; पण फाल्गुनराव तसबीर देत नाही. पुढे रेवती आणि अश्विनशेट यांच्यात प्रेम दुरावते. दोघे ही सत्य जाण्यासाठी फाल्गुनरावांच्या घरी येतात आणि तसबिरीचा घोटाळा आणि फाल्गुनरावांचा फार्स यांचा उलगडा होतो. नेपथ्य, रंगभुषा, वेशभूषा साजेशी झाली. साथीदार उत्तम असतानाही पहिल्याच नाट्यपदाला रंगत आली नाही; मात्र काही नाट्यपदे आणि अभिनयाला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
--
पात्र परिचय
फाल्गुनराव ः भालंचद्र उसगांवकर, कृतिका ः स्नेहा पुणेकर, अश्विनशेट ः नागेश फडते, रेवती ः मिलन कामत, भादव्या ः महेंद्र बांदोडकर, वैशाख ः दिगंबर कोलवाळकर, स्वाती ः नम्रता गडेकर, रोहिणी ः मनाली प्रियोळकर, नोकर ः हनुमंत आजगांवकर, मघा ः उज्ज्वला नाईक, साधू ः दामोदर नाईक.
--
सूत्रधार आणि साह्य
निर्माता ः किशोर मार्शेलकर, ऑर्गन ः प्रसाद गांवस, तबला ः सुदन फडते, पार्श्वसंगीत ः खेमराज पिळगांवकर, रंगभूषा ः जयंत नाटेकर, वेशभूषा ः गायत्री नाटेकर, नेपथ्य ः संतोष नाईक, नेपथ्य साहाय्य ः भूषण सावंत; प्रकाशयोजना ः राया कवळेकर, संतोष नाईक.
--
आजचे नाटक
नाटक ः संगीत ऋणानुबंध, सादरकर्ते ः खल्वायन रत्नागिरी. स्थळ ः स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह, मारूती मंदिर, रत्नागिरी. वेळ ः सायंकाळी ७ वा.
-