
राजापूर-दोनशेहून अधिक बंधाऱ्यांनी अडवले पाणी
ऱ्या
फोटो ओळी
-rat६p१०.jpg ःKOP२३L८०७५१
राजापूर ः ग्रामसेवकांनी श्रमदानातून बांधलेल्या बंधाऱ्यामध्ये साचलेले पाणी.
-rat६p११.jpg ःKOP२३L८०७५२ बंधारा बांधण्यासाठी राबताना ग्रामसेवक.
दोनशेहून अधिक बंधाऱ्यांनी अडवले पाणी
राजापूर तालुका ; टंचाई काळापूर्वीची तयारी, लोकसहभागाने बळ
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. ६ ः उशिरापर्यंत लांबलेल्या पावसामुळे यावर्षी तालुक्याला उशिरा पाणीटंचाईची झळ पोहचण्याची शक्यता आहे. मात्र पाणीटंचाईला सामोरे जाण्यासाठी वनराई बंधारे बांधण्याच्या उद्दिष्टांची पूर्ती करण्याच्यादृष्टीने पंचायत समितीने लोकसहभागातून एक पाऊल पुढे टाकले आहे. तालुक्यामध्ये लोकसहभागातून दोनशेहून अधिक बंधारे बांधण्यात आले आहेत.
गटविकास अधिकारी सुहास पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली वनराई बंधारे बांधण्याच्या उद्दिष्टपूर्तीकडे तालुक्यातील ग्रामपंचायतींनी एक पाऊल पुढे टाकले आहे. ग्रामस्थांसह विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, प्रशासन आदींच्या सहभाग आणि श्रमदानातून आजपर्यंत वनराई, विजय आणि कच्चे बंधारे असे मिळून २३७ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. त्यामध्ये ७१ वनराई, १८ विजय बंधारे आणि १४८ कच्चे बंधाऱ्यांचा समावेश आहे. बंधारे बांधण्याच्या उर्वरित उद्दिष्टांची पूर्ती करण्याच्यादृष्टीने वाटचाल सुरू असून गावोगावी लोकसहभाग आणि श्रमदानातून बंधारे बांधण्याचे काम सुरू आहे.
चौकट
पाणीसाठा रब्बीसाठी उपयुक्त
लोकसहभागातून बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाला असून, तो भविष्यातील पाणीटंचाईच्या काळात उपयुक्त ठरणार आहे. एप्रिल-मे महिन्यामध्ये पाण्यासाठी होणारी वणवण थांबवण्याच्यादृष्टीने उपयुक्त ठरणार आहे. रब्बी हंगामामध्ये गावोगावी करण्यात येणाऱ्या शेतीसाठी उपयुक्त ठरणार आहेत.
चौकट
दृष्टिक्षेपात राजापूर
*लोकसहभागातून एक हजार वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट
*आजपर्यंत २३७ बंधारे बांधून पूर्ण
*ग्रामस्थ, प्रशासन यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
*बंधाऱ्यात पाणीसाठी मुबलक
*पाण्यासाठी होणारी वणवण थांबणार