चिंदर येथे आज धार्मिक कार्यक्रम

चिंदर येथे आज धार्मिक कार्यक्रम

चिंदर येथे आज धार्मिक कार्यक्रम
आचरा ः श्री देव गवळदेव व श्री निरंकारी ब्राह्मणदेव चिंदर-भटवाडी पोसेपाणी येथे उद्या (ता. ७) धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यानिमित्त सकाळी भगवतीदेवीसह गवळदेव, निरंकारी ब्राह्मणदेवावर अभिषेक, विविध धार्मिक कार्यक्रम, दुपारी महाप्रसाद, हळदी-कुंकू समारंभ, सायंकाळी ५ ला चिंदर-भटवाडी मंडळाची फुगडी, सहाला स्थानिक भजने, दीपोत्सव आदी कार्यक्रम, रात्री ९.३० ला बुवा संदीप पुजारे विरुद्ध बुवा व्यंकटेश नर यांचा डबलबारी भजनाचा सामना रंगणार आहे. सर्वांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री भगवती उत्साही मंडळ चिंदर-भटवाडीतर्फे करण्यात आले आहे.
--
एसटीचे विभाग नियंत्रक पद रिक्त
कणकवली ः एसटीचे विभाग नियंत्रक हे पद पाच महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे एसटीच्या विभागातील कामावर परिणाम झाला आहे. एसटीचा डोलारा सावरण्यासाठी विभाग नियंत्रक पदाला अधिकारी गरजेचे आहेत. या पदावरील प्रकाश रसाळ यांना निवृत्तीनंतर वर्षभराची मुदतवाढ देण्यात आली होती; मात्र, त्याचा कालावधी संपल्यापासून हे पद रिक्त आहे. त्याचा पदभार सध्या विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांवर सोपवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com