अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीकडे आता लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीकडे आता लक्ष
अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीकडे आता लक्ष

अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीकडे आता लक्ष

sakal_logo
By

80808
देवगड अर्बन बँक


अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीकडे आता लक्ष

देवगड अर्बन बँक; पक्षांतर्गत बैठकांचा सिलसिला सुरू

सकाळ वृत्तसेवा
देवगड, ता. ६ ः येथील दी देवगड अर्बन को-ऑप. बँकेच्या निवडणुकीनंतर आता बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांच्या निवडीकडे सभासदांचे लक्ष लागले आहे. बुधवारी (ता. ८) ही निवड प्रक्रिया होणार असल्याने पक्षांतर्गत बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे. अधिक जागांमुळे भाजप प्रणित नवनिर्वाचित संचालकाची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी पुरस्कृत नवनिर्वाचित संचालकाची निवड होण्याचे निश्‍चित मानले जात आहे.
अर्बन बँक निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी पुरस्कृत ‘शिवम् सहकार’ पॅनेलने सर्व जागांवर विजय मिळविला होता. निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस पुरस्कृत ‘सहकार समृद्धी’ पॅनेलचा पराभव झाला होता. प्रत्यक्ष निवडणूक झालेल्या सर्व १२ जागांवर शिवम् पॅनेलने विजय मिळविला. तर यापूर्वी शिवम पॅनेलची एक जागा बिनविरोध झाली असल्याने बँकेच्या १३ जागांवर शिवम् पॅनेलची एकहाती सत्ता आली आहे. पॅनेलच्या विजयामध्ये आमदार नीतेश राणे, माजी आमदार अ‍ॅड. अजित गोगटे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे यांची रणनीती यशस्वी ठरली होती. निवडणुकीत शिवम् पॅनेलचे अभय बापट, दिनेश घाटे, अभिषेक गोगटे, सदाशिव ओगले, समीर पेडणेकर, प्रकाश बाळकृष्ण राणे, अमोल जनार्दन तेली, ललिता गजानन शेडगे, वैशाली विद्याधर तोडणकर, महादेव (बाबा) धोंडू आचरेकर, सुरेंद्र नारायण चव्हाण, संजय प्रभाकर बांदेकर असे एकूण १२ जण निवडणूकीत विजयी झाले होते. तर अनिल (बंड्या) वामन सावंत हे बिनविरोध निवडून आले होते. चुरशीच्या ठरलेल्या निवडणूकीत भाजप आणि राष्ट्रवादी पुरस्कृत ‘शिवम् सहकार’ पॅनेलच्या सर्व १२ उमेदवारांना मिळून एकूण २१ हजार ९७७ इतकी मते मिळाली होती. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेस पुरस्कृत ‘सहकार समृध्दी’ पॅनेलच्या सर्व १० उमेदवारांना मिळून एकूण १० हजार ५६३ इतकी मते मिळाली होती. एकूण ८२० मते अवैध ठरली होती. सहकारामधील या निवडणूकीकडे राजकीय पक्षांचे लक्ष लागले होते. सहकारामध्ये राजकारण असू नये असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नंदकुमार घाटे वारंवार सांगत असतात. तरीही स्थानिक राजकीय क्षेत्रात निवडणूका नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. आता प्रत्यक्ष निवडणूक मागे पडली असली तरीही चर्चेला अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीनंतरच पूर्णविराम मिळेल असे दिसते.
...........
चौकट
उत्सुकता वाढली
भाजप आणि राष्ट्रवादी पुरस्कृत ‘शिवम् सहकार’ पॅनेलने सर्व जागा जिंकल्या आहेत. एकूण १३ जागांपैकी ८ जागा भाजपप्रणित तर पाच जागा राष्ट्रवादी प्रणित आहेत. त्यामुळे आपोआपच अध्यक्षपदाची सुत्रे भाजपप्रणित संचालकाकडे जाण्याचे निश्‍चित दिसत आहे. त्यामुळे अध्यक्ष पदासाठी एकाच नावावर शिक्कामोर्तब होण्याच्या दृष्टीने पक्षांतर्गत बैठका घेतल्या गेल्या. आता बुधवारी (ता.८) निवड प्रक्रीया असल्याने सर्वसामान्यांना त्याची उत्सुकता आहे.