
राजापूर-ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रकाश देशपांडे
फोटो ओळी
-rat६p१८.jpg ः23L80831 प्रकाश देशपांडे
-------------
ग्रामीण साहित्य संमेलनाच्या
अध्यक्षपदी प्रकाश देशपांडे
तळवडेत १० पासूनला संमेलन; साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रात भरीव काम
राजापूर, ता.६ ः राजापूर लांजा तालुका नागरिक संघ, मुंबईच्यावतीने तालुक्यातील तळवडे येथे आठवे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्य-नाट्य-ग्रंथालय चळवळीतील जाणकार प्रकाश देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे.
तालुक्यातील तळवडे येथे गुरूवर्य स्व. महादेव कुंडेकर साहित्यनगरीमध्ये येत्या १० ते ११ फेब्रुवारी या कालावधीमध्ये आठवे मराठी ग्रामीण साहित्य संमेलन होणार आहे. राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ, मुंबई ही दक्षिण रत्नागिरीतील अमृतमहोत्सवी वर्षपूर्तीकडे यशस्वी वाटचाल करणारी संस्था असून संघाच्या यापूर्वीच्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाची अध्यक्षपदे सुप्रसिद्ध कवी अॅड. विलास कुवळेकर, वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर, संपादक गजाभाऊ वाघदरे, नाटककार दशरथ राणे, लेखक-कवी अशोक लोटणकर आदींनी भूषवली आहेत. यावर्षीच्या आठव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी देशपांडे यांची निवड झाली आहे. महाड येथे पार पडलेल्या कोकण इतिहास परिषदेचे देशपांडे यांनी अध्यक्षपद भूषवले असून ’कथा एका राधेची ’ व ’१९४२ चिपळूण’ यासह अनेक ऐतिहासिक दस्तऐवजांचे-पुस्तकांचे संपादन त्यांनी केले आहे. देशात स्वातंत्र्योत्तर कालखंडात झालेल्या आणीबाणीत त्यांनी कारावास भोगला आहे. कला, साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रामध्येही त्यांचे भरीव योगदान राहिले आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.