रत्नागिरी- राष्ट्रसेविका समितीतर्फे रत्नागिरीत शानदार संचलन

रत्नागिरी- राष्ट्रसेविका समितीतर्फे रत्नागिरीत शानदार संचलन

-rat6p27.jpg- KOP23L80872
रत्नागिरी : राष्ट्रसेविका समिती दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यातर्फे सघोष संचलन करताना स्वयंसेविका.
----------------
राष्ट्रसेविका समितीतर्फे रत्नागिरीत संचलन
रत्नागिरी, ता. ७ : राष्ट्र सेविका समिती दक्षिण रत्नागिरी जिल्ह्याचे सघोष संचलन आनंददायी आणि शिस्तबद्ध रितीने पार पडले. रविवारी (ता. ५) सायंकाळी लोकमान्य टिळक उद्यानातून संचलनास सुरवात झाली. दोन किमी अंतर पार करून पुन्हा उद्यानात संचलनाची सांगता झाली.
पुढे मार्गदर्शिका कामाक्षी गद्रे होत्या. घोष पथकात गार्गी आठवले यांनी घोष दंड तर रसिका फणसे यांनी ध्वज हाती घेतला होता. आरिषा यदमल ही सर्वात छोटी वंशी (बासरी) वादक होती. घोष गण रत्नागिरी, लांजा, देवरुख, चिपळूण, खेड यांचे एकत्रित होते हे विशेष. रा. स्व. संघाचे स्वयंसेवक ठिकठिकाणी वाहतूक नियंत्रण करण्यासाठी हजर होते. डॉ. कल्पना आठल्ये, महादेवी आरबोळे, अक्षया भागवत यांनी ध्वजावर पुष्पवृष्टी केली. मुख्य शिक्षिका अंजली पांचाळ होत्या. प्रार्थना मयुरी शिंदे हिने सांगितली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या वीणाताई लेले यांनी त्यांची वृद्धाश्रम संस्था आणि त्यांचे कार्य याबद्दल माहिती दिली. जिल्हा कार्यवाहिका अपर्णा आठवले यांनी मार्गदर्शनात समिती काय करते हे समजावून सांगितले. प्रास्ताविक जिल्हा सहकार्यवाहिका मीरा भिडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय शहर कार्यवाहिका शमिका गद्रे यांनी सांगितला. कांचन जोग यांनी गीत आणि स्मिताताई पाध्ये यांनी सांघिक गीत सांगितले. प्रिया केळकर यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com