कोटमध्ये राणी लक्ष्मीबाई क्रांतिज्योत फेरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोटमध्ये राणी लक्ष्मीबाई क्रांतिज्योत फेरी
कोटमध्ये राणी लक्ष्मीबाई क्रांतिज्योत फेरी

कोटमध्ये राणी लक्ष्मीबाई क्रांतिज्योत फेरी

sakal_logo
By

rat०६४१.txt

(पान ३ साठी)

फोटो ओळी
-rat६p३०.jpg-
८०८९५
लांजा ः आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या प्रचारार्थ राणी लक्ष्मीबाई क्रांतिज्योत फेरीचा आरंभ या क्रांतिज्योतीचे प्रज्वलन करून करण्यात आला.
---

कोटमध्ये राणी लक्ष्मीबाई क्रांतिज्योत फेरी

ग्रामीण मराठी साहित्य संमेलन ; प्रचारार्थ फेरी तळवडेला रवाना

लांजा, ता. ७ ः रणरागिणी राणी लक्ष्मीबाईंचा विजय असो, अशा घोषणा देत झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे मुळगाव असलेल्या कोट येथून आठव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या प्रचारार्थ राणी लक्ष्मीबाई क्रांतिज्योत फेरीचा आरंभ झाला. कोट गावच्या सरपंच निशिगंधा नेवाळकर यांच्या हस्ते या क्रांतिज्योतीचे प्रज्वलन करण्यात आले. यानंतर ही क्रांतिज्योत लांजा, तळवडे, सालपे, शिपोशी, भांबेड, वाटुळ तळवडेमार्गे पाचलकडे रवाना झाली.
राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाच्यावतीने आठवे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन हे १० फेब्रुवारीपासून राजापूर तालुक्यातील तळवडे येथे होत आहे. या संमेलनाच्या प्रचारार्थ राणी लक्ष्मीबाई क्रांतिज्योत फेरीला सुरवात झाली. या प्रसंगी संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष गजानन साळवींसह प्रकाश पाटोळे, दिनकर नेवाळकर, लोकमान्य वाचनालयाचे लांजाचे संचालक विजय हटकर, चंद्रकांत खामकर, अमर खामकर, राजू नेवाळकर, राजू सुर्वे, रूपेश दळवी, मिलिंद पाध्ये, माजी सैनिक बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते. ही क्रांतिज्योत फेरी सकाळी साडेदहा वाजल्याच्या दरम्याने लांजा येथील लोकमान्य वाचन या ठिकाणी आली. या क्रांतिज्योतीचे माजी नगराध्यक्ष संपदा वाघधरे तसेच वाचनाचे संचालक विनोद बेनकर, माजी अध्यक्ष विजय नारकर यांनी स्वागत केले.