मुख्यमंत्री सचिवालय कक्ष जिल्हास्तरावर

मुख्यमंत्री सचिवालय कक्ष जिल्हास्तरावर

rat०६४४.txt

(पान ३ साठी)

मुख्यमंत्री सचिवालय कक्ष जिल्हास्तरावर

रत्नागिरी, ता. ६ ः सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासनस्तरावर असलेली कामे अधिक लोकाभिमुख पारदर्शक व गतीमानतेने पूर्ण होण्यासाठी जिल्हास्तरावर मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रिय कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आले आहे. शासन महसूल व वनविभागाकडील आदेशानुसार डिसेंबर २०२२ पासून हा कक्ष झाला आहे. कार्यालयाचे पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
राज्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न शासनस्तरावर असलेली कामे अधिक लोकाभिमुख पारदर्शक व गतिमानतेने पूर्ण होण्यासाठी विभागीय स्तरावर विभागीय आयुक्त कार्यालय मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रिय कार्यालय स्थापन करण्यात आली आहे. जिल्हास्तरावरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या क्षेत्रिय कार्यालयाचे पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री यांना उद्देशून लिहिलेले अर्ज निवेदने संदर्भ जिल्हा स्तरावरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षात स्वीकारून त्यावर कार्यवाही करण्यात यावी. यासाठी पदसिद्ध विशेष कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी रत्नागिरी, मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, जिल्हा रत्नागिरी द्वारा जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी (दूरध्वनी क्र– ०२३५२-२२२४८३) हा पत्ता देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com