कणकवलीत भंगार साहित्याला आग

कणकवलीत भंगार साहित्याला आग

80948
कणकवली ः शहरातील बांधकरवाडी येथे भंगाराच्या साहित्याला लागेलेली आग.

कणकवलीत भंगार साहित्याला आग
कणकवली,ता. ६ ः शहरात बांधकरवाडी दत्तमंदिर रोड जवळ आज सायंकाळी सातच्या सुमारास परिसरातील एका भंगार व्यवसायिकाने लावलेल्या आगीत परिसरातील गवाताने पेट घेतला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. नगरपंचायतीच्या बंबाने आगीवर नियंत्रण आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला.
बांधकरवाडीत एका भंगाराच्या टाकवू साहित्याला आग लावण्यात आली. ही आग परिसरातील गवताला लागून आग भडकल्याने या आगीत तेथील भंगाराचे काही साहित्य, माडाची झाडे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. कन्झ्युमर्स सोसायटीचे चेअरमन संदीप नलावडे यांनी याबाबत तात्काळ नगराध्यक्ष समीर नलावडे यांना माहिती देत अग्निशमन बंब पाठवण्याची मागणी केली. त्यानंतर काही वेळातच नगरपंचायतीचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. त्यामुळे आग आटोक्यात आली. परिणामी भरवस्तीतील पुढील मोठा अनर्थ टळला. यावेळी नगरपंचायत कर्मचाऱ्यांसह संदीप नलावडे, नवराज झेमने आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com