वाट चुकलेली मुलगी नातेवाईकांच्या स्वाधीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाट चुकलेली मुलगी
नातेवाईकांच्या स्वाधीन
वाट चुकलेली मुलगी नातेवाईकांच्या स्वाधीन

वाट चुकलेली मुलगी नातेवाईकांच्या स्वाधीन

sakal_logo
By

वाट चुकलेली मुलगी
नातेवाईकांच्या स्वाधीन

सावंतवाडीतील प्रकार; शिक्षक, पोलिसांची तत्परता

सावंतवाडी, ता. ६ ः शहरातील एका शाळेत शिकत असलेल्या मुलीला आणण्यासाठी पालकांना उशीर झाल्यामुळे ती मुलगी वाट चुकली. त्या ठिकाणाहून जाणारे भोसले पॉलिटेक्निकच्या शिक्षकांनी तिला सावंतवाडी पोलीस ठाण्यात सोडले. त्यानंतर पोलिसांनी आवाहन केल्यानंतर तिच्या पालकांसह नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. नंतर तिला तिच्या पालकांच्या स्वाधीन केले. ही घटना आज सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास चराटा येथे भोसले पॉलिटेक्निक कॉलेजच्या रोडवर घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की ः येथील भोसले नॉलेज सिटी महाविद्यालयाचे शिक्षक गजानन भोसले, तेजस नाईक, अभिषेक राणे यांना ती चराठे भागात लिफ्ट मागताना आढळली. तिची भाषा समजत नसल्यामुळे त्यांनी तिला पोलिसांच्या स्वाधीन केले होते. तिच्याकडे शाळेची बॅग होती. त्यात दोन पुस्तके होती. त्यात कन्नड भाषेत लिहिलेले आहे. त्यामुळे ती कर्नाटक अथवा बेळगावमधील असावी, असा पोलिसांचा संशय होता तरी अधिक माहिती मिळाल्यास सावंतवाडी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन येथील पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक आनंद यशवंते यांनी केले. त्यांच्यासह सर्वच सहकाऱ्यांनी शोध मोहीम सुरू केली आणि अवघ्या ३० मिनिटात तिचे वडिल, घरातील व्यक्ती पोलिस ठाण्यात हजर झाले. वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार ती कर्नाटक येथे राहते. वडील सावंतवाडीतील एका बार्बर शॉपमध्ये काम करतात. त्यांनी आजच तीला शाळेत पाठविले होते. मात्र, दुकानात काम असल्यामुळे तिला आणायला जायला त्यांना उशिर झाला. त्याच कालावधीत ती चराठेच्या दिशेने निघून गेली. मुलगी मिळाली नसल्याने त्यांनी रिक्षा चालक गौरव सावंत व नाना भराडी यांच्या मदतीने शोध मोहीम घेतली; परंतु, शोधत असताना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सर्वांनी धाव घेत मुलीला ताब्यात घेतले. यावेळी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उपनिरीक्षक आनंद यशवंते, अमित गोते, गणेश कराडकर यांच्यासह डुमिंग डिसोझा, सतिश कविटकर यांनी त्यांना पालकांच्या स्वाधीन केले.