
नवीन कुर्ली शाळेस टीव्ही संच
80992
फोंडाघाट : येथील नवदुर्गा युवा मंडळ नवीन कुर्ली यांच्यावतीने नवीन कुर्ली प्राथमिक शाळेस टीव्ही संच भेट देण्यात आला.
नवीन कुर्ली शाळेस टीव्ही संच
फोंडाघाट : सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या नवदुर्गा युवा मंडळाने नवीन कुर्ली प्राथमिक शाळेस टीव्ही संच नुकताच पदान केला. मुख्याध्यापिका रेणुका जोशी यांच्याकडे हा टीव्ही संच सुपूर्द करण्यात आला. या कार्यक्रमावेळी नवदुर्गा युवा मंडळाचे उपाध्यक्ष अध्यक्ष दिपक शिंदे, नवीन कुर्ली ग्रामविकास मंडळ तथा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र कोलते, उपाध्यक्ष प्रिया दळवी, नवदुर्गा युवा मंडळाचे सल्लागार अरुणोदय पिळणकर, मंगेश मडवी, खजिनदार प्रदीप आग्रे, सदस्य सचिन साळसकर, अतुल डवूर, राजेश हुंबे, अनिल दळवी, सचिन परब, प्रकाश दळवी, सौ. पाटील, सौ. कामतेकर, सौ. तांबे आदी उपस्थित होते. यावेळी जोशी यांनी नवदुर्गा मंडळाचे आभार मानले.