
संगीत रणदुदंभी नाटकाला रसिकांची दाद
rat०७१७. txt
(टुडे पान २ साठी, अॅंकर)
संगीत राज्य नाट्य स्पर्धा--लोगो
फोटो ओळी
-rat७p५.jpg ः
८१०२५
रत्नागिरी ः राज्य नाट्यस्पर्धेत मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव सांस्कृतिक क्रीडा संघ-गोवा या संस्थेने सादर केलेल्या संगीत रणदुदंभी या नाटकातील एक क्षण.
(नरेश पांचाळ ः सकाळ छायाचित्रसेवा)
--
संगीत रणदुदंभी नाटकाला रसिकांची दाद
मोरजी सार्वजनिक क्रीडा संघ ; युद्ध जिंकण्याचे आवाहन देणाऱ्या तेजस्विनीची कथा
नरेश पांचाळ ः सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ७ ः एकीकडे पारतंत्र्य संकटातून क्रांती होत असताना ब्रिटिशांच्या अंमलाखाली खुशाल राहण्यात मानणारे काही राजे संस्थानिक आणि भारतीय यांच्या डोळ्यात अंजन घालणारे हे नाटक संगीत रणदुदंभी. हे नाटक वीर वामनराव जोशी यांच्या लेखणीतून उतरले. राज्य नाट्यस्पर्धेत इतिहासातील ही पाने मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव सांस्कृतिक क्रीडा संघ-गोवा ही संस्थेने उलगडली. उत्तम नाट्यपदांमध्ये रंगत जाणाऱ्या या नाटकात दिग्दर्शक जयेश बागकर यांच्या संकल्पनेतून सादर झाले. प्रियकरालाही दूर लोटून पदोपदी तह न करता युद्ध करून जिंकण्याचे आवाहन देणाऱ्या तेजस्विनीची कथा साकारण्यात संस्था यशस्वी झाली. सांकेतिक नेपथ्य वापरून रंगत जाणाऱ्या या नाटकाला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
----
काय आहे नाटक?
संगीत रणदुदंभी या नाटकात कंदर्प आणि मातंग हे दोन राजे. या नाटकातील तेजस्विनी ही कंदर्प राजाची प्रियेसी असते. कंदर्प हा स्वातंत्र्यासाठी मातंगाशी युद्ध न करता त्याच्याशी तह करण्यात धन्यता मानत असतो; पण तेजस्विनीला हे पटत नसते ती पारंतत्र्याच्या जाचाला कंटाळलेली असते; मात्र तेजस्विनी कंदर्पला तह न करता युद्ध केले पाहिजे अशी भूमिका घेते तर दुसरीकडे तिचा प्रियकर कंदर्प आपल्याच मताशी ठाम नसतो. पारतंत्र्याच्या जाचाला कंटाळलेला कंदर्प तह करतो. शेवटी त्याला पश्चताप होतो; पण आणि वेळ निघून गेल्यावर मातंगाशी दोन हात करायला जातो. त्यामध्ये दोघांचाही मृत्यू होतो. या नाटकात एकाकीपणे लढा देणाऱ्या, प्रसंगी स्वातंत्र्यासाठी प्रियकरालाही दूर लोटणाऱ्या आणि पदोपदी तह न करता युद्ध करून जिंकण्याचे आवाहन स्वीकारणाऱ्या तेजस्विनीची तडफदार ही कथा या नाटकात अधोरेखित करण्यात आली आहे. या नाटकातले अनेक प्रसंग रसिकांना भावले. नेपथ्यातून सांकेतिक रंगमंचाचा वापर करण्यात आला असला तरी उत्तम रंगभूषा, वेशभूषा, पार्श्वसंगीत रंगतदार झाले. उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या या नाटकातील नाट्यपदांचा आस्वाद रसिकांनी घेतला. प्रियकरालाही दूर लोटून पदोपदी तह न करता युद्ध जिंकण्याची तेजस्विनीची कथा रंगवण्यास संस्था यशस्वी झाली.
-----
* पात्र परिचय
कंदर्प ः साबा च्यारी, पशुपाल ः काशिनाथ शेटगांवकर, शिशुपाल ः सावळो सावंत, सौदामिनी ः पल्लवी कदम-डांगी, सेवक ः राजेश शेटगांवकर, तेजस्विनी ः शारदा शेटकर, नृत्यांगना ः सानिका शेट्ये, कालकुट ः गौतम शेटगांवकर, हलाहल ः चन्द्रो दाभोलकर, धीरसिंह ः सर्वेश शेटगांवकर, मातंग युवराज ः वसंत शेटगांवकर, शृगाल ः समीर शेटगांवकर, देवल ः पंकज शेटगांवकर, सैनिक ः सुनील शेटगांवकर, ऋतुराज शेटगांवकर, स्वयंम शेटगांवकर, जय शेटगांवकर, अभिमान शेटगांवकर, देऊ शेटगांवकर.
--
* सूत्रधार आणि साह्य
ऑर्गन ः सुनाद कोरगावकर, तबला ः गोपाळ शेटगांवकर, पार्श्वसंगीत ः प्रितेश पाटील, रंगभूषा ः दीपक शेटगांवकर, वेशभूषा ः चणेकर, नाट्य भांडार डिजोली-गोवा. वेशभूषा सहाय्यक ः लवू नाईक, जावेद शेख, नेपथ्य ः अक्षय शेटगांवकर, सहाय्यक ः प्रकाश शेटगांवकर, रूपेश शेटगांवकर, सूर्यकांत पेडणेकर, गणेश शेटगांवकर, रघुवीर शेटगांवकर.
--
आजचे नाटक
नाटक ः संगीत मल्लिका, सादरकर्ते ः कलारंग नाट्यप्रतिष्ठान वरवडे, खंडाळा, रत्नागिरी. स्थळ ः स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी. वेळ ः सायं. ७ वा.