मुख्यमंत्री सचिवालय कक्ष
जिल्हा मुख्यालयात स्थापन

मुख्यमंत्री सचिवालय कक्ष जिल्हा मुख्यालयात स्थापन

मुख्यमंत्री सचिवालय कक्ष
जिल्हा मुख्यालयात स्थापन

विशेष अधिकारी नियुक्त; प्रलंबित प्रश्नांमध्ये समन्वय

सिंधुदुर्गनगरी, ता. ७ ः जिल्हास्तरावरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या क्षेत्रिय कार्यालयाच्या कामकाजाकरिता जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन केला आहे. या कक्षासाठी निवासी उपजिल्हाधिकारी हे पदसिध्द विशेष अधिकारी असून नायब तहसिलदार व महसूल सहाय्यक, अव्वल कारकून यांची या कक्षाकरिता नियुक्ती केली आहे, अशी माहिती विशेष कार्य अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी आविषकुमार सोनोने यांनी दिली.
राज्यातील सर्वसामान्य जनतेचे दैनंदिन प्रश्न, शासन स्तरावर असलेली कामे व त्यासंदर्भात प्राप्त होणारे अर्ज, निवेदन आदी कार्यवाहीमध्ये अधिक लोकाभिमुख, पारदर्शकता व गतिमानता आणण्याच्या अनुषंगाने त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवून परिणामकारक निपटारा होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रिय कार्यालय त्वरीत सुरु करण्याबाबत सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तरी यापुढे सर्वसामान्य जनतेने मुख्यमंत्री महोदय यांना सादर करावयाचे आपले दैनदिन प्रश्न शासन स्तरावर असलेली कामे व त्यासंदर्भातील प्राप्त होणारे अर्ज, निवेदन मंत्रालय, मुंबई येथे सादर न करता मुख्यमंत्री सचिवालय कक्ष सिंधुदुर्ग येथे सादर करावीत, असे आवाहन पदसिध्द विशेष कार्य अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी सोनोने यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com