गवस यांचा थायलंडला अभ्यास दौरा

गवस यांचा थायलंडला अभ्यास दौरा

81062
बाबू गवस

गवस यांचा थायलंडला अभ्यास दौरा
सावंतवाडी ः गेली सहा वर्षे सिंधुदुर्ग, गोवा व कर्नाटक येथे विषमुक्त शेती अभियान राबवून त्या अंतर्गत सेंद्रिय शेतीचा प्रसार व प्रचार करणाऱ्या उसप (ता.दोडामार्ग) येथील लक्ष्मी कृपा एंटरप्रायझेसच्या बाबू गवस यांच्या कार्याची दखल वेस्टिज मार्केटिंग कंपनीने घेतली असून त्यांची थायलंड अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन या कंपनीने शेतकऱ्यांचा एकरी उत्पादन खर्च कमी करुन उत्पन्न वाढविण्यासाठी व निरोगी जीवन जगण्यासाठी सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. श्री. गवस हे गेली सहा वर्षे सिंधुदुर्ग, गोवा व कर्नाटक येथे विषमुक्त शेती अभियान राबवत आहेत. त्या अंतर्गत सेंद्रिय शेतीचा प्रसार व प्रचार, सेंद्रिय शेतीच्या प्रचारासाठी गावागावात शेतकऱ्यांचे मेळावे व बैठका घेवून प्रबोधन करत आहेत. सिंधुकृषी मेळाव्यामध्ये स्टॉल लावून शेतकऱ्यांमध्ये जागृती करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेवून कंपनीने त्यांची थायलंड अभ्यास दौऱ्यासाठी निवड केली आहे.
----------------
निवृत्ती वेतनधारकांची बैठक
सिंधुदुर्गनगरी ः निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांच्या अडी-अडचणीसंदर्भात, जिल्हा कोषागार कार्यालय सिंधुदुर्ग येथे शुक्रवारी (ता.१७) सकाळी ११ वाजता तिमाही बैठकीचे आयोजन केले आहे, अशी माहिती अप्पर कोषागार अधिकारी संजय घोगळे यांनी दिली. निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारक व त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची दर ३ महिन्यांनी जिल्हा स्तरावर बैठक आयोजित केली जाते. त्यामध्ये बँकच्या व शासनाच्या सेवेसंदर्भात संबंधितांना येणाऱ्या अडी-अडचणींवर उपाय योजण्यासाठी चर्चा केली जाते. यासंदर्भात आपल्याकडील तक्रारी, हरकतीसह या बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com